“शहरभर मुरलीधर”, प्रवीण तरडेंची फेसबुक पोस्ट

Pravin Tarde | आज 13 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा चौथा टप्पा पार पडणार आहे. राज्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, नगर, शिर्डी, बीड, औरंगाबाद, जालना, पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. मतदार आपापल्या मतदारसंघातील बुथवर जात लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदानाचा आनंद घेताना दिसत आहेत.

पुणे लोकसभा मतदारसंघात अनेकांचं लक्ष लागलं आहे. कारण या मतदारसंघात तिहेरी लढत होताना दिसत आहे. भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून पुणे मिळवण्यासाठी भाजपने सर्व ताकद पणाला लावली आहे. पुणे येथे काही दिवसांआधी बारामती, शिरूर आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी देशाचे पंतप्रधान यांनी पुण्यात येऊन भाषण केलं. त्यानंतर पुणे येथे काल परवा मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रचारसभा घेण्यात आली तेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महायुतीचे दिग्गज नेते आणि अभिनेता व दिग्दर्शक प्रवीण तरडे (Praveen Tarde) यांनी आपल्या सरसेनापती हंबीरराव या सिनेमाच्या डायलॉगबाजीवरून त्यांच्या हटके स्टाईलने मुरलीधर मोहोळ यांचं नाव घेऊन प्रचार केला. (Praveen Tarde)

“परिस्थिती जेवढी तिखट हिंदू तेवढाच तिखट”

सरसेनापती हंबीरराव या सिनेमातील परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट अशा डायलॉगबाजीचे रूपांतर प्रवीण तरडे यांनी “परिस्थिती जेवढी तिखट हिंदू तेवढाच तिखट,” अशा शब्दात त्यांनी भाषण करत असताना हल्लाबोल केला. यामुळे प्रवीण तरडे (Praveen Tarde) हे आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत.

सध्या पुण्यात भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी जोरदार प्रचार होताना दिसत आहे. तसेच त्यांच्या विरोधात रवींद्र धंगेकर यांना देखील चांगला प्रतिसाद मिळत आहेत. धंगेकर यांच्यासाठी एका टॅगलाईनचा प्रचारासाठी वापर केला जात आहे.

प्रवीण तरडे यांची फेसबुक डिलीट

यासर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आता प्रवीण तरडे (Praveen Tarde) यांनी एक फेसबुक पोस्ट केली होती. त्याची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत होती. आपल्या फेसबुक पोस्टवर त्यांनी “शहरभर मुरलीधर” अशी फेसबुक पोस्ट केली. मात्र ती फेसबुक पोस्ट डिलीट करण्यात आली आहे. याचं कारण अद्यापही समोर आलं नाही.

pravin tarde murlidhar mohol

News Title – Pravin Tarde Facebook Post For BJP Pune Loksabha Candidate Murlidhar Mohol

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने घेऊन गेले ‘या’ मतदारसंघात पैशांच्या बॅगा; ‘या’ बडया नेत्याचा आरोप

मनोरंजनसृष्टीत शोककळा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघातात जागीच मृत्यू

राजकारणात तापणार! निवडणुकीच्या रणधुमाळीत राज ठाकरेंनी शरद पवारांवर केली अत्यंत कडू शब्दात टीका

अहमदनगरमध्ये आदल्या रात्री भाजपने पाडला पैशांचा पाऊस; व्हिडीओ समोर

या राशींच्या व्यक्तींना राजकारणात यश मिळेल; विरोधकांना धूळ चारणार