Shahaji Bapu Patil | महाराष्ट्रात बऱ्याच मतदारसंघात बंडखोरी दिसून आली आहे. याचा फटका महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही युतीमधील घटक पक्षांना बसला आहे. अशात सोलापूर मतदार संघ तर भाजपसाठी मोठी अडचण ठरला आहे. येथे धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत महायुतीला मोठा धक्का दिला होता.
शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटलांना माढ्याची उमेदवारी दिली आहे. आता मविआकडून माढा येथे जोरदार प्रचार सुरू आहे. अशात शिंदे गटातील ‘काय झाडी, काय डोंगर.. सगळं ओके’ फेम शहाजीबापू पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटलांवर खरमरीत टीका केली आहे.
तुम्हाला रक्ताची शपथ आहे, आता मैदानात सापडलंय त्याला सोडायचं नाही, असं म्हणत शहाजी बापूंनी मोहित पाटलांवर टीका केली काहे. सांगोल्यातील महायुतीच्या प्रचारसभेत शहाजी बापू पाटील बोलत होते. माझ्या नादी लावू नका, नको त्या भानगडीत पडू नको, आतापर्यंत खूप जीभ आवरलीय, असं म्हणत त्यांनी तूफान फटकेबाजी केली.
काय म्हणाले शहाजी बापू पाटील?
धैर्यशील मोहिते पाटील यांच्या घरी महादेव आणून सोडला, तर तीन तासात त्यांचा राक्षस होईल. माझ्या नादी लावू नका, नको त्या भानगडीत पडू नको, आतापर्यंत खूप जीभ आवरलीय. जाऊद्या लेकरू आहे, राजसिंग दादाचं म्हणून बोलायला नको. पण, मोहिते पाटील माझ्या डोक्यात गेलाय, ह्याच्या***, डोक्यातून हलता हलत नाही, अशा शब्दांत शहाजी बापू यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर टीका केली.
पुढे ते म्हणाले की, रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि शहाजी बापू पाटलांनी तुमच्यासाठी काही केलं असेल, तर प्रत्येकाने कमळाचं बटण दाबा. असं आवाहन देखील यावेळी शहजी बापू (Shahaji Bapu Patil) यांनी मतदारांना केलं. यावेळी त्यांनी शरद पवारांवर देखील निशाणा साधला.
शरद पवारांवर साधला निशाणा
फडणवीस साहेब तुम्ही यांना खारीक, बदाम खाऊ घालून सुद्धा यांनी तुमच्या विरोधातच बंडखोरी केली. मोहिते पाटलांनी डीसीसी बँकेतून 1400 कोटी कर्ज घेतले आणि बुडवले. माझा सख्खा भाऊ मेल्यावर पण लगेच आठ सभा केल्या एवढं प्रामाणिक राहिलो, इतकी प्रामणिक श्रद्धा मी शरद पवारांवर ठेवली पण काय दिलं आपल्याला?, असा सवाल शहाजी बापू यांनी केला.
पुढे बोलताना त्यांनी एक दावा देखील केला.मोहिते पाटलांनी तालुका उध्वस्त करून टाकला, लोकं नावं घ्यायला घाबरत असतील, मी उघडपणे सांगतो. उजनी, टेम्बू आणि म्हैसाळ या सर्व योजनेतून पाणी फडणवीस यांनी दिलेलं आहे. असं शहाजी बापू (Shahaji Bapu Patil) म्हणाले आहेत.
मांजर मारल्यावर काशीला जातात, तसं गुवाहाटीला गेलो
यावेळी शहाजी बापू यांनी गुवाहाटीच्या ट्रीपबद्दलही खुलासा केला. याच गुवाहाटीमध्ये महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा डाव ठरला होता. सगळं काही प्लॅनिंग येथेच ठरली होती. याबाबत बोलताना शहाजी बापू म्हणाले की, आमची इच्छा होती उद्धव साहेब, देवेंद्र साहेब मुख्यमंत्री व्हावे. माझ्या मनात सल होती की, ज्याच्यामुळे निवडून आलो, त्याच्या पाठीत खंजीर खुपसलं म्हणून जसं मांजर मारल्यावर काशीला जातात, तसं आम्ही गुवाहाटीला गेलो.
News Title : Shahaji Bapu Patil on Dhairyasheel Mohite Patil
महत्त्वाच्या बातम्या –
“…तर मी टक्कल करून फिरेल”, मनसे नेते अविनाश जाधवांचं मोठं वक्तव्य
मनोज जरांगे पाटील निवडणूक लढवणार, केली सर्वात मोठी घोषणा
“4 तारखेला आमच्यासोबत गुलाल खेळायला या”, आदिती तटकरेंचा अंधारेंवर पलटवार
हवामान विभागाकडून मोठी अपडेट; महाराष्ट्राला पुन्हा पाऊस झोडपणार