परिक्षा न देता मिळवता येणार सरकारी नोकरी, असा करा अर्ज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Government Job 2024 | परिक्षा न देता आता सरकारी नोकरी मिळवता येणार आहे. तुम्हाला वाटलं असेल की हे कसं शक्य आहे तर हो हे शक्य आहे. नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या उमेदवारांना अधिकृत सूचना जारी करण्यात आल्या आहेत. पात्र आणि इच्छूक उमेदवार nats.education.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपला उमेदवारी अर्ज भरू शकता. तारीख, नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा, पगार याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलीये. (Government Job 2024)

या पदांसाठी भरती

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 57 रिक्त पदांसाठी भरती करण्यात आलीये. यामध्ये आयटीआय अप्रेंटिशिपसाठी फिटरच्या 2 जागा आहेत. इलेक्ट्रिशनच्या 13 जागा आहेत ड्राफ्ट्समनच्या 2 जागा आहेत. प्लंबरच्या 2 जागा आणि COPA च्या 18 जागा आहेत. (Government Job 2024)

तसेच यामध्ये डिप्लोमा अप्रेंटिशिपसाठी सिव्हिल 2 जागा, इलेक्ट्रिकल 4 जागा, GNM 4 जागा उपलब्ध आहेत. यामध्ये हॉटेल मॅनेजमेंटसाठी एक जागा असून फार्मासिस्ट पदवीधरसाठी 2 जागा आहेत. यासाठी वयोमर्यादा ही 18 ते 30 वर्षे असावी. (Government Job 2024)

अर्ज दाखल करण्यासाठी संस्था, कॉलेज मान्यताप्राप्त असलेल्या विद्यापीठातून आयटीआय/डिप्लोमा/पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

पात्र उमेदवारांची आयटीआय/डिप्लोमा/ग्रॅज्युएशनमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना बोलावलं जाईल आणि पुढील प्रक्रिया केली जाईल. (Government Job 2024)

अर्ज कसा भरावा?

अर्ज भरणं हा फार महत्त्वाचा मुद्दा असतो. आयटीआयच्या उमेदवारांनी https://apprenticeshipindia.org वर जाऊन भेट द्यावी. शिकाऊ म्हणून स्वत:ची निवड करून घ्यावी.

डिप्लोमा धारक पदवीधर https://nats.education.gov.in/student_type.php या संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी करावी.

शैक्षणिक पात्रतेची गुणपत्रे, प्रमाणपत्रे आणि संबंधीत प्रिंटआऊट जोडून ‘महाव्यवस्थापक (एचआर), पार्बती -II HE प्रकल्प, नागवेन, जिल्हा- मंडी, हिमाचल प्रदेश येथील पत्त्यांवर पाठवून द्यायची.

News Title – Government Job 2024 Requirement

महत्त्वाच्या बातम्या

तरुणांसाठी खुशखबर! स्टार्टअपसाठी सरकारकडून मिळणार तब्बल ‘इतक्या’ लाखांचं लोन

व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवत प्रसिद्ध अभिनेत्रीने संपवलं आयुष्य!

कशाला करतो गॅरंटीची बात!, रॅपच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाचा जोरदार हल्लाबोल

‘आधी अजितदादांनी हे सांगावं’; रोहित पवारांचं थेट अजित पवारांना चॅलेंज

इथे मिळतंय मोफत पेट्रोल! मतदान करा अन् ‘इतक्या’ रुपयांचं पेट्रोल मोफत मिळवा