“मोदींनी कोल्हापुरात भडकाऊ भाषण केलं, तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न केला”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Patil | महाविकास आघाडीकडून कोल्हापूरचे शाहू छत्रपती लोकसभेच्या निवडणुकीत उतरले आहेत. कॉँग्रेसच्या तिकीटावर ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर, संजय महाडीक हे महायुतीकडून उभे राहिले आहेत.  कोल्हापुरात संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरल्याचं दिसून आलं.

कोल्हापुरात झालेल्या सभेत मोदी यांनी जोरदार भाषण केलं. कोल्हापुरातील तपोवन मैदान येथे दुपारी चारच्या सुमारास सभेला सुरुवात झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात नेहमीप्रमाणे मराठी भाषेत केली. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल करत कोल्हापूरकरांना आवाहन देखील केलं. अशात मोदींवर मविआ नेते आणि दिवंगत आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी निशाणा साधला आहे.

काय म्हणाले रोहित पाटील?

मोदींनी कोल्हापुरात येऊन भडकाऊ भाषण केल्याचा आरोप करत रोहित पाटील यांनी जोरदार टीका केली. ते कोल्हापुरात बोलत होते. ‘शाहू छत्रपतींच्या गादीला विरोध करण्यासाठी स्वतः देशाच्या पंतप्रधानांना इथे यावं लागतं.हा विरोध शाहू छत्रपतींना नाही तर राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराला आहे.’, असं रोहित पाटील (Rohit Patil ) म्हणाले आहेत.

मोदींनी (Narendra Modi)कोल्हापुरात भडकाऊ भाषण केलं, तरुणांची माथी कशी भडकतील याची दक्षता घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही यावेळी रोहित पाटील यांनी केलाय. तसंच पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकांचा शाहू महाराजांच्या विचारांवर विश्वास आहे. तरुणवर्ग भावनेच्या भरात न जाता बेरोजगारीच्या विरोधात मतदान करेल. महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील आणि एक चांगला संदेश देशभर जाईल.

नरेंद्र मोदी काय म्हणाले होते?

कोल्हापूरमध्ये फूटबॉल प्रसिद्ध आहे, असं मला कळलं. त्यामुळे फूटबॉलच्या भाषेतच सांगतो की, निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यानंतर एनडीए आणि भाजपा 2-0 ने पुढे आहे. तर काँग्रेस आणि इंडिया आघाडी शून्यावर आहे. आता दोन गोल झाल्यानंतर कोल्हापूरकडे तिसऱ्या गोलची जबाबदारी आली आहे. कोल्हापूरकर असा गोल करतील की, इंडिया आघाडीच्या चारी मुंड्या चित होतील. दुसरीकडे इंडिया आघाडीने देशविरोधी आणि द्वेषाच्या राजकारणाचे दोन सेल्फ गोल केले आहेत. यामुळे मोदी सरकारच पुन्हा एकदा येणार. असं भाषणात नरेंद्र मोदी म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, इंडिया आघाडीचे लोक आता देशावर राग काढत आहेत. कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये यांचे नेते दक्षिण भारताचे विभाजन करण्याची भाषा वापरत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ‘अहद पेशावर, तहद तंजावर, हिंदवी स्वराज्य’ अशी घोषणा ज्या मातीत झाली, ती माती इंडिया आघाडीच्या मनसुब्यांना पूर्ण करून देईल का? त्यामुळे विभाजनवादी भाषा बोलणाऱ्यांना तुम्ही चोख प्रत्युत्तर द्या,असं आवाहन देखील यावेळी मोदींनी केलं.

News Title : Rohit Patil on Narendra Modi

महत्त्वाच्या बातम्या-

“मोहिते पाटील माझ्या डोक्यात गेलाय, ह्याच्या***, माझ्या नादाला लागू नको”

“…तर मी टक्कल करून फिरेल”, मनसे नेते अविनाश जाधवांचं मोठं वक्तव्य

मनोज जरांगे पाटील निवडणूक लढवणार, केली सर्वात मोठी घोषणा

“4 तारखेला आमच्यासोबत गुलाल खेळायला या”, आदिती तटकरेंचा अंधारेंवर पलटवार

हवामान विभागाकडून मोठी अपडेट; महाराष्ट्राला पुन्हा पाऊस झोडपणार