भगवान शंकराच्या कृपेने ‘या’ राशींच्या समस्या सुटणार!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Horoscope Today | पंचांगानुसार, आजचा 29 एप्रिल 2024 चा दिवस जवळपास सर्वच राशीसाठी शुभ आहे. आजच्या दिवशी भगवान शंकराच्या कृपेने काही राशीच्या व्यक्तींच्या सर्व समस्या मार्गी लागतील. सोमवारचा दिवस काही राशीसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, यासोबतच काही शुभ किंवा अशुभ घटना याबाबत भाकीत देते.

आजचे राशीभविष्य

मेष रास : आज कोणत्याही गोष्टीबाबत तर्क लावत बसू नका. मनात संशय आणू नका. तुम्हाला व्यवसायात जास्त मेहनत करावी लागेल, तरच तुमचे काम पूर्ण होईल. तुम्हाला तुमच्या योजनांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे लागेल.

वृषभ रास : आज तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण येतील. जर तुम्ही एखाद्याला पैसे दिले असतील तर ते तुम्हाला परत मिळू शकता. काही करमणुकीच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. जर तुम्हाला कोणत्याही आरोग्याच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर त्यात हयगय करू नका, लगेच उपचार घ्या.

मिथुन रास : आज तुमच्या खूप दिवसांपासून असलेल्या समस्या दूर होतील. तुमची अडखळलेली कामे आज पूर्ण होतील. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. आज तुमचा दिवस छान जाईल.

कर्क रास : घरापासून लांब प्रवासाचे योग येतील. तुमच्या आजूबाजूला काही वादविवाद होऊ शकतात.अनेक दिवसांपासून काही काम पूर्ण न झाल्यामुळे तुम्ही काळजीत असाल तर तुम्हाला त्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. नवीन संधी मिळतील.

सिंह रास : नशिबावर अवलंबून (Horoscope Today) राहून तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू केले असेल तर त्यात तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. सुसंवाद चांगला ठेवा. कुणाचंही मन दुखावू नका.

कन्या रास : कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. नोकरी व्यवसायात सहज कामे होतील. कामात काही चूक झाली तर लगेच बॉसची माफी मागावी, नाहीतर वाढू शकते.

तूळ रास : जर तुम्ही घर वगैरे खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होईल.तुमच्या पदोन्नतीमुळे तुम्हाला एका ठिकाणाहून दुसरीकडे जावे लागू शकते. एकंदरीत आजचा दिवस स्मरणात राहील, असा जाईल.

News Title- Horoscope Today 29 April

महत्वाच्या बातम्या-

“मोदींनी कोल्हापुरात भडकाऊ भाषण केलं, तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न केला”

“मोहिते पाटील माझ्या डोक्यात गेलाय, ह्याच्या***, माझ्या नादाला लागू नको”

“…तर मी टक्कल करून फिरेल”, मनसे नेते अविनाश जाधवांचं मोठं वक्तव्य

मनोज जरांगे पाटील निवडणूक लढवणार, केली सर्वात मोठी घोषणा

“4 तारखेला आमच्यासोबत गुलाल खेळायला या”, आदिती तटकरेंचा अंधारेंवर पलटवार