घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचून घ्या!

Petrol-Diesel Price Today 29 April 2024 

Petrol-Diesel Price Today | राज्यातील पेट्रोलच्या किमती या डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित असतात. त्यामुळे नियमितपणे त्यात सुधारणा केली जाते. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी असे अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात.

जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. आज (29 एप्रिल) रोजीचे इंधनदर सुधारले आहेत. आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किमती खाली सविस्तर दिल्या आहेत.

महाराष्ट्रातील इंधनदर

महाराष्ट्रात 1 एप्रिल 2024 रोजी पेट्रोलचे दर 104.90 रुपये प्रति लिटर होते. आता महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे. आज (Petrol-Diesel Price Today ) पेट्रोलची किंमत प्रमुख शहर मुंबई येथे पेट्रोल 104.19 रुपये प्रति लीटर तर डिझेल 92.13 रुपये प्रति लीटरमध्ये मिळत आहे.

गेल्या 10 दिवसांत महाराष्ट्रात पेट्रोलची सरासरी किंमत 104.87 रुपये प्रतिलिटर राहिली. वाहनचालकांना इंधन दरात जराही दिलासा मिळाला नाही. केंद्र आणि राज्य सरकारकडून  (Petrol-Diesel Price Today )इंधनाच्या किमतीवर उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि व्हॅट जोडल्यानंतर पेट्रोलची किरकोळ किंमत निश्चित केली जाते. ही योजना जून 2017 पासून देशभरात लागू आहे. त्यामुळे सर्व राज्यांमध्ये दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर अपडेट केले जातात.

महानगरांतील इंधन दर

राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 94.76 रुपये आणि डिझेलची किंमत 87.66 रुपये प्रति लीटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर 103.93 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 90.74 रुपये प्रति लीटर आहे.तर, चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 100.73 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 92.32 रुपये प्रति लिटर आहे.

आज राज्य पातळीवर बोलायचं झालं तर बिहारमध्ये  (Petrol-Diesel Price Today )पेट्रोल-डिझेल महाग झालं आहे. बिहारमध्ये आज पेट्रोलचा दर 3 पैशांनी वाढून 107.12 रुपये प्रति लिटर झाला तर, डिझेलचा दर 3 पैशांनी वाढून 93.84 रुपये प्रति लिटर झाला आहे. याशिवाय आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा, हिमाचल, झारखंड, केरळ, मध्य प्रदेशमध्ये पेट्रोल-डिझेल महाग झाले आहे.

News Title- Petrol-Diesel Price Today 29 April 2024 

महत्त्वाच्या बातम्या –

भगवान शंकराच्या कृपेने ‘या’ राशींच्या समस्या सुटणार!

“मोदींनी कोल्हापुरात भडकाऊ भाषण केलं, तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न केला”

“मोहिते पाटील माझ्या डोक्यात गेलाय, ह्याच्या***, माझ्या नादाला लागू नको”

“…तर मी टक्कल करून फिरेल”, मनसे नेते अविनाश जाधवांचं मोठं वक्तव्य

मनोज जरांगे पाटील निवडणूक लढवणार, केली सर्वात मोठी घोषणा

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .