नागरिकांनो घराबाहेर पडताना काळजी घ्या! उन्हाचा पारा वाढणार, हवामान विभागाकडून हायअलर्ट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maharashtra Weather Update | एप्रिल महिन्यात ऊन आणि पाऊस दोन्हीमुळे नागरिकांचे हाल बेहाल झाले. आता मे महिन्यात देखील असंच वातावरण पाहावयास मिळणार आहे. राज्यात अजूनही उन्हाचा पारा भरभर वाढतच चालला आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी तापमान चाळीशी पार गेलं आहे. त्यामुळे नागरिकांना बाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर विदर्भात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कुठे उन्हाच्या तीव्र झळा तर कुठे अवकाळी असं वातावरण सध्या राज्यात दिसून येतंय.

‘या’ भागात पारा वाढणार

राज्यावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे कमाल तापमानात वाढ होत आहे. आता हवामान विभागाकडून मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, कोकण, गोव्यात आज (29 एप्रिल) उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार असल्याचा (Maharashtra Weather Update ) अंदाज आहे. 30 एप्रिल ते 4 मे पर्यंत हवामान कोरडे राहणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. तर, काही ठिकाणी वीजांच्या कडकडाट्यासह वादळी वाऱ्यांचा पाऊस पडणार आहे.

‘या’ ठिकाणी अवकाळीचा इशारा

वातावरणातील खालच्या स्थरातील द्रोणीका रेषा आज पूर्व विदर्भापासून उत्तर केरळ पर्यंत मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकावरून जात आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी मेघ गर्जना आणि वीजांच्या कडकडासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने आज मराठवाडा आणि विदर्भातील बीड, लातूर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.

News Title- Maharashtra Weather Update Latest news

महत्त्वाच्या बातम्या –

घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचून घ्या!

भगवान शंकराच्या कृपेने ‘या’ राशींच्या समस्या सुटणार!

“मोदींनी कोल्हापुरात भडकाऊ भाषण केलं, तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न केला”

“मोहिते पाटील माझ्या डोक्यात गेलाय, ह्याच्या***, माझ्या नादाला लागू नको”

“…तर मी टक्कल करून फिरेल”, मनसे नेते अविनाश जाधवांचं मोठं वक्तव्य