पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल, हे रस्ते असणार बंद; पर्यायी मार्ग कोणते?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (29 एप्रिल) पुण्यात भव्य सभा होणार आहे. त्यामुळे पुण्यातील वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. मोदींची आज संध्याकाळी रेस कोर्स येथे सभा होत असल्याने वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे.त्यामुळे दुपारनंतर काही रस्ते वाहतुकीत बंद ठेवण्यात येणार आहेत. तर येथील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. वाहने पार्क करण्यासाठी देखील जागा नेमून देण्यात आल्या आहेत.

पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेण्यात येणार आहे. या सभेच्या निमित्ताने महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. आज संध्याकाळी हेलिकॉप्टरने रेसकोर्स येथील सभेच्या ठिकाणी मोदी दाखल होणार आहेत. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षांचे नेते उपस्थित राहतील.

पुण्यात ‘हे’ मार्ग बंद राहणार

पुण्यातील रेसकोर्स परिसरातील पाण्याची टाकी ते टर्फ क्लब चौक रस्त्यावर दुहेरी वाहतूक करण्यात येत आहे. टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार ते टर्फ क्लब चौक रस्ता बंद राहणार आहे. तसंच सोलापूर रस्त्यावरील अर्जुन रस्ता जंक्शन ते टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार हा रस्ता बंद राहील. तसच बिशप स्कूल सर्कल ते टर्फ क्लब चौक (Pune News) रस्ता बंद राहील.

पर्यायी मार्ग कोणते?

ज्या ठिकाणी रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत, तेथील मार्गावरील वाहनचालकांनी मम्मादेवी चौक, बेऊर रस्ता चौकातून पुढे त्यांच्या इच्छितस्थळी जावे. अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.

‘हे’ रस्ते तात्पुरते बंद राहणार

गोळीबार मैदान ते भैरोबानाला (सोलापूर रस्ता)
गोळीबार मैदान चौक लुल्लानगर ते इच्छित स्थळी.
भैरोबानाला ते गोळीबार मैदान चौक (सोलापूर रस्ता)

पार्किंग कुठे करणार?

पुणे-सोलापूर सासवड रस्त्याने येणाऱ्या चारचाकी वाहनांसाठी भैरोबानाला ते वानवडी बाजार पोलिस चौकीचौक दरम्यान आणि वानवडी बाजार ते मम्मादेवी जंक्शन पार्किंग असेल.
पुणे, अहमदनगर, पिंपरी चिंचवडकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनांसाठी सर्किट हाऊस ते मोरओढा, वॉर मेमोरिअल ते घोरपडी रेल्वे गेट आणि आर्मी पब्लिक स्कूल घोरपडी गाव.
पुणे- सातारा, सिंहगड रस्ता आणि स्वारगेट परिसरामधील वाहनांसाठी बेऊर रोड जंक्शन, कोयाजी रोड अंतर्गत रस्ते, तीनतोफा चौक आणि बिशप स्कूल परिसर.
बसेससाठी रामटेकडी उड्डाण (Pune News)पुलावरून पुढे हडपसर इंडस्ट्रिअल इस्टेटमध्ये पार्किंगची सुविधा.
सर्व व्ही.व्ही.आय.पी. वाहनांसाठी भैरोबानाला चौक ते आर्मी पब्लिक स्कूल दरम्यान एम्प्रेस गार्डन येथे पार्किंग सुविधा असेल.

News Title-  Pune News Changes in transport for Pm Narendre Modi Sabha
महत्त्वाच्या बातम्या –

नागरिकांनो घराबाहेर पडताना काळजी घ्या! उन्हाचा पारा वाढणार, हवामान विभागाकडून हायअलर्ट

घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचून घ्या!

भगवान शंकराच्या कृपेने ‘या’ राशींच्या समस्या सुटणार!

“मोदींनी कोल्हापुरात भडकाऊ भाषण केलं, तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न केला”

“मोहिते पाटील माझ्या डोक्यात गेलाय, ह्याच्या***, माझ्या नादाला लागू नको”