ग्लोइंग स्किनसाठी घरीच बनवा व्हिटॅमिन C सीरम; फॉलो करा ‘या’ स्टेप्स

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Homemade Vitamin C Serum | चेहऱ्याची चमक कायम ठेवण्यासाठी बदलत्या हवामानासोबतच त्याची देखभाल करण्याच्या पद्धतीतही बदल करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात टॅनिंग, दमट हवामानात खूप घाम येणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात.यावर विटामीन सी सीरम खूप फायदेशीर ठरू शकते.

निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी व्हिटॅमिन सी आणि ई हे दोन अत्यंत आवश्यक जीवनसत्त्वे आहेत. व्हिटॅमिन सीमुळे तुमची त्वचा लवकर वृद्ध होत नाही. म्हणजेच तुम्ही अधिक काळ तरुण दिसू शकता. आता हे सीरम घरीसुद्धा बनवता येईल. या लेखात याच्या टिप्स दिल्या आहेत.

व्हिटॅमिन सीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे त्वचेला मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात. हे कोलेजनचे उत्पादन देखील वाढवते. व्हिटॅमिन सी त्वचेला सूर्याच्या नुकसानापासून सुरक्षित ठेवते. बाजारात उपलब्ध असलेले व्हिटॅमिन सी सीरम खूप महाग असते. बऱ्याच जणांना ते विकत घेणं परवडत नाही. त्यामुळे आज आपण घरी सहजपणे व्हिटॅमिन सी सीरम कसे तयार करावे हे जाणून घेणार आहोत.

व्हिटॅमिन C सीरमसाठी लागणारे साहित्य

घरीच सीरम बनवण्यासाठी तुम्हाला 2 व्हिटॅमिन सी (Homemade Vitamin C Serum) गोळ्या, 1 चमचा ग्लिसरीन, 2 चमचे गुलाबजल, 1 व्हिटॅमिन ई कॅप्सूल, 1 चमचा एलोवेरा जेल (पर्यायी), ड्रॉपर असलेली काचेची बाटली इ. साहित्य लागेल.

‘या’ टिप्स फॉलो करा

सर्वप्रथम एका लहान पातेल्यात (शक्यतो काचेच्या) गुलाबपाणी आणि कोरफडीचे जेल घालून चांगले मिक्स करा.
यानंतर व्हिटॅमिन सीच्या गोळ्यांची पावडर बनवून त्यात घाला.
नंतर त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे जेल टाका.
यानंतर ग्लिसरीन घालून मिक्स करा.
चमच्याच्या मदतीने सर्व साहित्य चांगले मिसळा.
काचेच्या बाटलीत भरून एक दिवस फ्रीजमध्ये ठेवा.
घरगुती व्हिटॅमिन सी सीरम (Homemade Vitamin C Serum) वापरण्यासाठी तयार आहे.
दिवसातून दोनदा हे तयार सीरमवापरा. त्वचेचा पोत सुधारेल आणि ग्लोही वाढेल.

त्वचेला दीर्घकाळ तरूण आणि निरोगी ठेवण्यासाठी, पूर्णपणे सीरमवर अवलंबून राहू नका. निरोगी आहार, पुरेसे पाणी पिणे आणि पुरेशी झोप घेणे यावर देखील लक्ष केंद्रित करा. तुमची जीवनशैली तुमच्या शरीरावर खूप परिणाम करत असते.

News Title- Homemade Vitamin C Serum

महत्त्वाच्या बातम्या –

पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल, हे रस्ते असणार बंद; पर्यायी मार्ग कोणते?

नागरिकांनो घराबाहेर पडताना काळजी घ्या! उन्हाचा पारा वाढणार, हवामान विभागाकडून हायअलर्ट

घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचून घ्या!

भगवान शंकराच्या कृपेने ‘या’ राशींच्या समस्या सुटणार!

“मोदींनी कोल्हापुरात भडकाऊ भाषण केलं, तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न केला”