‘महाराष्ट्राचं दुर्भाग्य राहिलं की…’; नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नुकतंच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी बोलताना मोदींनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी मोदींना शिवसेना आणि राष्ट्रवादी तुटली आहे, त्यांचे दोन पार्टनर तुमच्यासोबत आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवारांच्या बाजूने सहानुभूतीची लाट दिसत आहे? , असा प्रश्न विचारण्यात आला. यावर मोदींनी उत्तर दिलंय.

“महाराष्ट्राचं दुर्भाग्य राहिलं की…”

मोदी म्हणाले की “महाराष्ट्रात बऱ्याच काळापासून मिलीजुली सरकार आहे. विलासराव देशमुख होते, शरद पवारही जेव्हा मुख्यमंत्री बनले तेही पूर्ण बहुमताने एकटे बनू शकले नाहीत. दुसरं महाराष्ट्राचं दुर्भाग्य राहिलं की बराच काळ पाच वर्षांपर्यंत कोणी एक मुख्यमंत्री राहिलाच नाही.

बऱ्याच काळानंतर देवेंद्र फडणवीस पहिले व्यक्ती होते ज्यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला आणि पूर्ण सरकारवर एकही डाग लागला नाही. लोकांचं भलं करणारं सरकार होतं. आता सहानुभूती आमच्या बाजूने पाहिजे.”

“महाराष्ट्राच्या भल्यासाठी त्याग केला”

आज शिंदेंच्या नेतृत्वात जे सरकार चाललं आहे. भाजपच्या जास्त जागा असूनही त्याग केला. महाराष्ट्राच्या भल्यासाठी त्याग केला. आम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून असं केलं असं काहींना वाटत होतं पण असं नाही. आम्ही महाराष्ट्राला हे सांगितलं की असं नाहीय. आम्ही महाराष्ट्रासाठी जगतो, आमच्यासाठी जगत नाही हे लोकांना सांगितलं. त्यामुळे सहानुभूती आमच्याबाजूने आहे, असं मोदींनी (Narendra Modi) म्हटलंय.

इतका मोठा पक्ष, एक यशस्वी मुख्यमंत्री आज उपमुख्यमंत्री बनून, एक प्रकारे स्वत: चा सन्मान सोडून आज भाजप फक्त महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी ही भूमिका घेत आहे, असं मोदींनी (Narendra Modi) सांगितलं.

जे लोक आमच्यासोबत मिळून लढले. आमच्यासोबत लढून महाराष्ट्राच्या लोकांकडून मते मागितली पण मुख्यमंत्री बनण्यासाठी व्यक्तिगत महत्त्वकांक्षेसाठी आणि त्यांच्या अहंकारामुळे तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्यापासून असलेल्या जोडीला धोका दिला. याचा लोकांमध्ये राग आहे, असंही मोदी (Narendra Modi) म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

ग्लोइंग स्किनसाठी घरीच बनवा व्हिटॅमिन C सीरम; फॉलो करा ‘या’ स्टेप्स

पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल, हे रस्ते असणार बंद; पर्यायी मार्ग कोणते?

नागरिकांनो घराबाहेर पडताना काळजी घ्या! उन्हाचा पारा वाढणार, हवामान विभागाकडून हायअलर्ट

घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचून घ्या!

भगवान शंकराच्या कृपेने ‘या’ राशींच्या समस्या सुटणार!