“औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा..”, भाजपचा उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chandrashekhar Bawankule | लोकसभा निवडणुकीत नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत जोरदार टीका करत आहेत. देशात इंडिया आघाडीविरुद्ध भाजपाचा सामना आहे. राम मंदिराचा मुद्दा या निवडणुकीत प्रमुख विषय बनला आहे. भाजपाकडून या मुद्यावरून प्रचार करण्यात येत आहे. यावरूनच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीत रामराम करत फिरत आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी कोकणात केली. ठाकरेंच्या या टिकेला आता भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना सणसणीत प्रत्युत्तर दिलंय.

भाजपचा ठाकरेंवर पलटवार

चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. त्यांनी पोस्ट करत म्हटलं की, मोदी निवडणुकीत रामराम करत फिरत आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी कोकणात केली. मला त्यांना सांगायचं आहे की, औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणं कधीही चांगलं. असा टोला बावनकुळे यांनी ठाकरेंना लगावला आहे.

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगले पण तुम्ही आता राष्ट्रविरोधी विचारांना साथ देत आहात.सत्ता गेल्यानंतर तुम्हाला कोकणवासीयांची आठवण झाली. अडीच वर्षे सत्तेच्या काळात कोकणला दमडीही दिली नाही. उलट चांगल्या प्रकल्पांना विरोध केला आणि ही देवभूमी विकासापासून वंचित ठेवली. आता फक्त मतं मिळविण्यासाठी तुम्हाला कोकणची आठवण झाली. अशी टीका देखील भाजपकडून करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरेंवर बावनकुळे बरसले

कोकण वादळात सापडलं तेव्हा तुम्ही घरात बसून होतात तर फडणवीस आणि नारायण राणे कोकणात येऊन लोकांना आधार देत होते. महापूर आला तेव्हा तुमच्या लोकांनी केलेली गुंडगिरी कोकणी माणूस विसरला नाही. मोदी आणि नारायण राणे यांच्या प्रयत्नातून कोकणचा विकास होतोय. आता तुम्ही कितीही थापा मारल्या तरी कोकणी माणूस तुमच्या खोट्या भूलथापांना बळी पडणार नाही.असंही बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं असून लवकरच तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यापूर्वी देशासह राज्यात सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार केला जातोय. पंतप्रधान मोदी आज पुण्यात महायुतीच्या प्रचारासाठी येणार आहेत. तर, राहुल गांधी देखील महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी राज्यात येऊन गेलेत.

News Title- Chandrashekhar Bawankule Criticised Uddhav Thackrey

महत्त्वाच्या बातम्या –

ग्लोइंग स्किनसाठी घरीच बनवा व्हिटॅमिन C सीरम; फॉलो करा ‘या’ स्टेप्स

पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल, हे रस्ते असणार बंद; पर्यायी मार्ग कोणते?

नागरिकांनो घराबाहेर पडताना काळजी घ्या! उन्हाचा पारा वाढणार, हवामान विभागाकडून हायअलर्ट

घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचून घ्या!

भगवान शंकराच्या कृपेने ‘या’ राशींच्या समस्या सुटणार!