मावळ लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीरंग बारणे यांची ताकद वाढली

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maval Loksabha | मावळ लोकसभा मतदारसंघाचे (Maval Loksabha) विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे याआधी मावळमधूनच दोन वेळा खासदार राहिले आहेत. आता मावळ लोकसभा मतदारसंघातून (Maval Loksabha) हॅटट्रिक पूर्ण करण्यासाठी बारणे जोमाने कामाला लागले आहेत. अशात श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख पदाधिकारी देखील जोमाने काम करत असल्याचं पाहायला मिळत. मनसेमुळे श्रीरंग बारणे यांची ताकद वाढली आहे.

श्रीरंग बारणे यांची ताकद वाढली

काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे मनसे नेते नितीन सरदेसाई, अमित खोपकर, जिल्हाप्रमुख जितेंद्र पाटील यासह मनसे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी दिलेला शब्द अंतिम असतो. श्रीरंग बारणे यांच्या हॅटट्रिकसाठी मनसे पूर्ण ताकतीनिशी प्रचार करायला उतरेल, अशी ग्वाही नितीन सरदेसाई यांनी दिली होती. (Maval Loksabha)

सहाही विधानसभा मतदारसंघात मनसे श्रीरंग बारणे यांना निवडून देण्यासाठी सदैव तत्पर राहिल अशी भूमिका मनसेनं घेतलीये. मावळ तालुक्यामध्ये मनसे अध्यक्ष रूपेश म्हाळसकर यांच्या नेतृत्वामध्ये बारणे यांना तिसऱ्यांदा खासदारकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लोणावळा, तळेगाव दाभाडे, वडगाव, देहूरोड अशा शहरात त्यांनी मनसैनिकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या प्रचारासाठी आणि विजयासाठी आवाहन केलं आहे.

दरम्यान, मनसे महायुतीच्या प्रचारासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. मावळमधून श्रीरंग बारणे यांना खासदारकीची हॅटट्रिक मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर रत्नगिरी सिंधुदुर्गमध्ये देखील मनसेनं नारायण राणे यांच्या बाजूनं प्रचार करायला सुरूवात केली. मनसे नेते बाळा नांदगावर, मनसे नेते अविनाश जाधव, संदीप देशपांडे हे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये होते.

मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देण्यात आलीये. तर त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरे गटातून संजोग वाघेरे हे उमेदवार आहेत. आता दोघांमध्ये मावळची जनता कोणाला विजयाचा कौल देईल? हे निकालादिवशीच समोर येईल.

News Title – Maval Loksabha Election MNS Leader Campaign For Shrirang Barane Hat-Trick Win

महत्त्वाच्या बातम्या

ग्लोइंग स्किनसाठी घरीच बनवा व्हिटॅमिन C सीरम; फॉलो करा ‘या’ स्टेप्स

पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल, हे रस्ते असणार बंद; पर्यायी मार्ग कोणते?

नागरिकांनो घराबाहेर पडताना काळजी घ्या! उन्हाचा पारा वाढणार, हवामान विभागाकडून हायअलर्ट

घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचून घ्या!

भगवान शंकराच्या कृपेने ‘या’ राशींच्या समस्या सुटणार!