पैसे आणि बँकांशी संबंधित ‘हे’ नियम बदलणार; थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

1 May Rules change l नवीन महिन्याच्या सुरवातीला अनेक नियमांत बदल होत असतो. अशातच आता मे महिना सुरु होईल अगदी एक दिवस बाकी आहे. अशातच आता मे महिन्यात एलपीजी, सीएनजी, पीएनजीच्या किमतीत अनेक मोठे बदल होऊ शकतात. तसेच या नवीन महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलेंडर आणि बँकांशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. तर आज आपण मे महिन्यात कोणते नियम बदलणार आहेत ते जाणून घेऊयात…

एलपीजी सिलेंडरची किमती बदलणार :

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल विपणन कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल करतात. त्यानुसार आता कंपन्या 14 किलो आणि 19 किलो सिलिंडरच्या किमती बदलू शकतात. यासोबतच कंपन्या पीएनजी आणि सीएनजीच्या किमतीही अपडेट करू शकतात.

1 May Rules change l YES बँकेचा हा नियम बदलणार :

खाजगी क्षेत्रातील येस बँकेच्या वेबसाइटनुसार बचत खात्यांवरील किमान सरासरी शिल्लक शुल्क (MAB) देखील 1 मे 2024 पासून बदलले जाणार आहे. बचत खात्याचा प्रो मॅक्स MAB 50,000 रुपये असेल, ज्यावर जास्तीत जास्त 1,000 रुपये शुल्क आकारले जाईल.

तसेच बचत खाते Pro Plus, Yes Essence SA आणि YES Respect SA मधील किमान शिल्लक रुपये 25,000 असेल. या खात्यावर कमाल मर्यादा 750 रुपये आकारले जातील. बचत खाते PRO मध्ये किमान 10,000 रुपये शिल्लक असेल. यासाठी 750 रुपयांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. हा नियम 1 मे 2024 पासून लागू झाला आहे.

ICICI बँकेच्या या नियमांमध्ये बदल होणार :

ICICI बँकेने बचत खात्यावरील शुल्कातही बदल केले आहेत. 1 मे पासून नवीन शुल्क लागू होणार आहे. बँकेने सांगितले की डेबिट कार्डवरील वार्षिक शुल्क आता 200 रुपये करण्यात आले आहे. मात्र ग्रामीण भागात हे शुल्क 99 रुपये असेल. याशिवाय 1 मे पासून 25 पाने असलेल्या चेकबुकवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यानंतर ग्राहकाला प्रत्येक पानावर 4 रुपये द्यावे लागतील.

जर ग्राहकाने IMPS द्वारे रकमेचा व्यवहार केला तर त्याला त्यावर शुल्क भरावे लागेल. यासाठी प्रत्येक व्यवहारासाठी 2.50 ते 15 रुपये शुल्क आकारले जाईल. हे शुल्क व्यवहाराच्या रकमेवर अवलंबून असते.

एचडीएफसी बँक एफडी योजना :

HDFC बँकेने सिनियर सिटीझन केअर FD लाँच केली आहे. या FD मध्ये गुंतवणुकीची अंतिम तारीख 10 मे 2024 आहे. गुंतवणूकदाराला या एफडीवर 0.75 टक्के अतिरिक्त व्याज मिळते. ही एफडी नियमित एफडीपेक्षा खूप वेगळी आहे. तसेच 5 वर्ष ते 10 वर्षांच्या एफडीवर 7.75 टक्के व्याज दिले जाते. हे व्याज 5 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर उपलब्ध आहे.

News Title – 1 May Rules change

महत्त्वाच्या बातम्या

मावळ लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीरंग बारणे यांची ताकद वाढली

“औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा..”, भाजपचा उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार

‘महाराष्ट्राचं दुर्भाग्य राहिलं की…’; नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य

ग्लोइंग स्किनसाठी घरीच बनवा व्हिटॅमिन C सीरम; फॉलो करा ‘या’ स्टेप्स

पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल, हे रस्ते असणार बंद; पर्यायी मार्ग कोणते?