अजितदादांच्या मनातील दर्द पुन्हा छलका!, त्या मुद्द्यावरुन शरद पवारांवर टीका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अजित पवार यांनी बारामती मतदारसंघात प्रचार सभा घेतली. या सभेत बोलताना अजित पवारांनी शरद पवारांवर पुन्हा एकदा टीका केली आहे.

अजितदादांच्या मनातील दर्द पुन्हा छलका

आम्हाला कोणीच सांगीतलं नाही, मग आम्ही वागायचं कसं. काहीजण म्हणतात राव अजितने या वयात साहेबांना सोडायला नको पाहिजे होतं. आहो मी पण आता साठीच्या पुढे गेलो आहे. आम्हाला पण संधी मिळाली पाहिजे ना, असं म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) पुन्हा एकदा त्यांच्या मनातील सल बोलून दाखवली.

 इथे मी 64 वर्षांचा झालो- अजित पवार

माझी प्रशासनावर पकड नाही का? कुटुंब प्रमुख तीसी- पस्थिशीलाच आपल्या मुलांच्या हाता कारभार देऊन मोकळे होतात, इथे मी 64 वर्षांचा झालो आहे, असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं.

आता अनेकांना फोन यायला लागले अनेकांची आठवण यायला लागली. 35- 35 वर्ष जिथे गेले नाहीत, तीथं पण काहीजण जायला लागले आहेत, ही वस्तुस्थिती आहे, असं सांगत शरद पवारांनी घेतलेल्या त्यांच्या विरोधकांच्या भेटीवर अजित पवारांनी निशाणा साधलाय.

सांगितलं नाही पाहिजे पण तुम्ही घरची माणसं आहात. त्यांनी मला बोलावलं आणि सांगितलं की अजित मी निर्णय घेतलेला आहे, दोन किंवा एक मे रोजी ‘लोक माझे सांगती’ पुस्तकाचा प्रकाश सोहळा आहे, त्या कार्यक्रमात मी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहे. सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करा, मी म्हटलो बरं पण त्यानंतर त्यांनी दोन दिवसांत आपला राजीनामा माघारी घेतला, असं अजित पवारांनी सांगितलं.

दरम्यान, बारामती लोकसभा निवडणुकीकडे फक्त महाराष्ट्रच नाही तर देशाचं लक्ष लागलं आहे, कारण बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगत आहे. बारामतीच्या या लढाईत अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात संघर्ष पाहायला मिळतोय.

महत्त्वाच्या बातम्या- 

मावळ लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीरंग बारणे यांची ताकद वाढली

“औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा..”, भाजपचा उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार

‘महाराष्ट्राचं दुर्भाग्य राहिलं की…’; नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य

ग्लोइंग स्किनसाठी घरीच बनवा व्हिटॅमिन C सीरम; फॉलो करा ‘या’ स्टेप्स

पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल, हे रस्ते असणार बंद; पर्यायी मार्ग कोणते?