या लोकांना पॅनकार्ड आधारशी लिंक करावे लागणार नाही; जाणून घ्या तुमचाही समावेश आहे का?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pan-Aadhaar Link l सध्या आधारकार्ड आणि पॅनकार्ड हे सर्वात महत्वाचे कागदपत्र आहेत. त्यामुळे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पॅन कार्डचा वापर आर्थिक व्यवहारासाठी केला जातो. त्याचप्रमाणे आधारकार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. याचा वापर गैर-सरकारी आणि सरकारी कामांसाठी केला जातो. अशा परिस्थितीत सरकारने पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. लिंकबाबत सरकारकडून अनेक डेडलाइन देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत कोणत्या लोकांना पॅन कार्ड लिंक करण्याची गरज नाही.

कोण पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करू शकत नाही? :

काही लोकांना पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची गरज नाही. यामध्ये 80 वर्षांवरील लोकांचा समावेश आहे. याशिवाय आयकर कायद्यानुसार, अनिवासी किंवा भारतीय नागरिकत्व नसलेल्यांना पॅन कार्ड लिंक करण्याची गरज नाही.

ज्या पॅनकार्डधारकांनी अजूनही त्यांचे पॅनकार्ड लिंक केलेले नाही त्यांनी लवकर करून घ्यावे. जर आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक नसेल तर पॅन कार्ड आपोआप निष्क्रिय होईल. याचा अर्थ असा की पॅन कार्ड कागदपत्र म्हणून वापरता येणार नाही. याशिवाय अनेक आर्थिक व्यवहारांवरही बंदी घालण्यात आली आहे.

Pan-Aadhaar Link l बँकेशी संबंधित व्यवहार बंद होतील :

पॅन आधारशी लिंक नसल्यास आयटीआर दाखल करता येणार नाही. याशिवाय बँकेशी संबंधित व्यवहारही बंद आहेत. तसेच अनेक सरकारी योजनांचा लाभही मिळत नाही. पॅन कार्ड सक्रिय करण्यासाठी आयकर विभागाच्या वेबसाइटवर जावे लागेल आणि 1,000 रुपये विलंब शुल्क भरून पॅनला आधारशी लिंक करावे लागेल.

त्यामुळे ज्या नागरिकांनी अद्यापही पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक केले नाही त्यांनी लवकरात लवकर करावे. जेणेकरून तुमचं पॅनकार्ड बंद होणार नाही.

News Title – Pan-Aadhaar Link News

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांच्या मनातील दर्द पुन्हा छलका!, त्या मुद्द्यावरुन शरद पवारांवर टीका

पैसे आणि बँकांशी संबंधित ‘हे’ नियम बदलणार; थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार?

मावळ लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीरंग बारणे यांची ताकद वाढली

“औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा..”, भाजपचा उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार

‘महाराष्ट्राचं दुर्भाग्य राहिलं की…’; नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य