पुण्यासाठी केंद्र सरकारने मागील 10 वर्षात भरपूर काही दिलं- मुरलीधर मोहोळ

पुणे | पुणे जिल्ह्यातील बारामती (Baramati), शिरुर (Shirur), मावळ (Maval) आणि पुणे (Pune) लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात सभा घेणार आहे. पुण्यातील रेस कोर्स मैदनावर या भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. मोदींच्या सभेआधी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुण्यासाठी केंद्र सरकारने मागील 10 वर्षात भरपूर काही दिलं आहे, असं मोहोळ यांनी सांगितलं.

“पुण्याला केंद्र सरकारने भरपूर दिलं”

पुण्यासाठी केंद्र सरकारने मागील 10 वर्षात भरपूर काही दिलं. येत्या काळातदेखील पुण्याच्या विकासासाठी केंद्र सरकार बरंच काही देणार आहे असा विश्वास असल्याचं मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी म्हटलंय.

आज मोदींची पुण्यात सभा आहे ही पुणेकरांनी चांगली बाब आहे. पुणेकरांना मोदींना बघायला मिळणार आहे शिवाय त्यांना ऐकायला देखील मिळणार आहे. या सगळ्यासाठी पुणेकर उत्सुक आहे. आतापर्यंतच्या सभेतली सगळ्यात चांगली आणि मोठी सभा आजची होणार असल्याचा दावा मुरलीधर मोहोळांनी (Murlidhar Mohol) केला आहे.

नागरिकांना अडचण होणार नाही- मुरलीधर मोहोळ

साधारण दोन लाख लोक मोदींच्या सभेला उपस्थित राहणार असल्याची अपेक्षा असल्याचं मोहोळांनी सांगितलं आहे. तशी लोकांसाठी सोय देखील करण्यात आलीये. नागरिकांना अडचण होणार नाही, याची काळजी घेतली आहे, असंही मोहोळ यांनी सांगितलंय.

दरम्यान, पुण्यातील सभेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापूरमध्येही आज जाहीरसभा होणार आहे. सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी सोलापुरात येणार आहेत

महत्त्वाच्या बातम्या- 

या लोकांना पॅनकार्ड आधारशी लिंक करावे लागणार नाही; जाणून घ्या तुमचाही समावेश आहे का?

अजितदादांच्या मनातील दर्द पुन्हा छलका!, त्या मुद्द्यावरुन शरद पवारांवर टीका

पैसे आणि बँकांशी संबंधित ‘हे’ नियम बदलणार; थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार?

मावळ लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीरंग बारणे यांची ताकद वाढली

“औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा..”, भाजपचा उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार