राजकारणात नवा ट्विस्ट! शरद पवारांचा ‘हा’ विश्वासू नेता म्हणतोय मी कुठेही जायला तयार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad Pawar l सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र फिरत आहेत. त्यामुळे राजकीय पक्षाचे पदाधिकारी जोरदार शक्तिप्रदर्शन करताना दिसत आहेत. अशातच आता सोलापूरमधून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. शरद पवा यांचे निकटवर्तीय अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मात्र त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

मी कुठेही जायला तयार- अभिजित पाटील

गेल्या काही दिवसांपूसर्वी राज्य सहकारी शिखर बँकेने विठ्ठल सहकारी कारखाना सील केल्याची घटना घडली होती. त्यामुळे अभिजित पाटील हे चांगलेच कोंडीत सापडले आहेत. अशातच आता काल अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, मात्र त्यांच्या या भेटीनंतर अभिजित पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

त्यावेळी त्यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. मी कारखाना वाचवण्यासाठी कुठेही जायला तयार असल्याचे पाटील म्हणाले आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे अभिजीत पाटील हे शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत. मात्र शिखर बँकेने ते अध्यक्ष असलेल्या विठ्ठल सहकारी कारखान्यावर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर त्यांना नाईलाजाने भाजपमध्ये जावे लागणार अशा चर्चा सोलापूरमध्ये सुरु झाल्या आहेत. मात्र आता अभिजीत पाटील आणि देवेंद्र फडणवीसांच्या या भेटीत काय घडणार याकडे सर्वच राजकीय लोकांच्या नजरा लागल्या आहेत.

Sharad Pawar l अभिजित पाटील भाजपमध्ये जाणार का? :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, अभिजीत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याचे पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. तसेच त्यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला आहे की, तुम्ही भाजपमध्ये जाणार का? त्यावर अभिजित पाटील म्हणाले की, मी भाजपमध्ये जाण्याच्यादृष्टीने आज कोणतीही चर्चा केलेली नाही.

मला आजच्या भेटीत कारखान्याला मदत आवश्यक आहे, कारखान्याचं सील काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा आहे असे मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले आहे. त्यामुळे मी साहजिकच या मोबदल्यात त्यांची देखील काहीतरी अपेक्षा असेल तर ते आऊट ऑफ द वे जाऊन मदत करत आहेत त्यामुळे आम्हीही त्यांची मदत करणे, ही स्वाभाविक अपेक्षा आहे असे अभिजीत पाटील म्हणाले आहेत.

News Title – Abhijeet Patil And Devendra Fadanvis Meet

महत्त्वाच्या बातम्या

या लोकांना पॅनकार्ड आधारशी लिंक करावे लागणार नाही; जाणून घ्या तुमचाही समावेश आहे का?

अजितदादांच्या मनातील दर्द पुन्हा छलका!, त्या मुद्द्यावरुन शरद पवारांवर टीका

पैसे आणि बँकांशी संबंधित ‘हे’ नियम बदलणार; थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार?

मावळ लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीरंग बारणे यांची ताकद वाढली

“औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा..”, भाजपचा उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार