अमिरची मुलगी जगतेय सामान्य जीवन; नुपूरच्या घराचा व्हिडीओ व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Aamir Khan Daughter Home | अभिनेता अमिर खानची मुलगी आयरा खान आणि मराठमोळा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे हे लग्नाच्या आधीपासून अधिक चर्चेत होते. नुपूर आणि आयराचा नुकताच विवाह राजस्थान येथे पार पडला. तिचं लग्नानंतरचं जीवन पहता अगदी मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणे आयरा आपलं आयुष्य जगत आहे. (Aamir Khan Daughter Home)

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांमध्ये अमिर खानचं देखील नाव येतं. अमिर खानची मुलगी आयरा ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आपल्या वडिलांचं घर हे भलं मोठं होतं. परदेशात फिरणं, उच्च राहणीमान, मोठी घरं, मोठ्या गाड्या स्टारकिड्स असं जीवन जगतात असं अनेकदा पाहिलं असेल. मात्र आता अमिर खानची मुलगी आयरा खान अत्यंत साधं जीवन जगत आहे. तिला साधं जीवन जगायला आवडत असल्याचं पहायला मिळतंय. (Aamir Khan Daughter Home)

नुपूरसोबत विवाह झाल्यानंतर आपल्या प्रेमाला, आपल्या नात्याला सोबत घेऊन ती पुढे जात आहे. लग्नानंतरच्या आयुष्यामध्ये तिचं घर जरी छोटं असलं तरीही तिला आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवता येत आहे. नुकतेच काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामध्ये नुपूर शिखरेच्या घरातील बेडरूम, हॉल आणि स्वयंपाक घर दिसत आहे. ते नक्कीच अमिर खानच्या घरापेक्षा साधारण आणि छोटं पाहायला मिळत आहे.

नुपूरच्या घराचे व्हिडीओ व्हायरल

नुपूर शिखरे आणि त्याची आई सोशल मीडियावर व्हिडीओ बनवत असतात. ते दोघेही नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामध्ये नुपूर पलंगावर बसलेला दिसतो. त्यावेळी त्याची आई त्याला फॅन पुसायला सांगते. तेव्हा ते बेडरूम कोणत्या लग्झरीज फ्लॅटचं नसून सामान्य बेडरूम पाहायला मिळतंय. (Aamir Khan Daughter Home)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nupur Shikhare (@nupur_popeye)

 

सोशल मीडियावरील त्यांचे व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. आता बेडरूमच्या व्हिडीओनंतर नुपूरच्या स्वयंपाक घराचा फोटो देखील व्हायरल होताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. (Aamir Khan Daughter Home)

 

View this post on Instagram

 

नुA post shared by PRITAM S. (@pritam_shikhare)

 

नुपूर शिखरेची आई कथ्थक प्रशिक्षक

नुपूर शिखरे आणि त्याची आई हे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. आधी बेडरूम नंतर स्वयंपाक घर आणि आता हॉलचा व्हिडीओ देखील त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय. हॉल अगदी साधारण आहे. नुपूरची आई एक कथ्थक प्रिशिक्षक आहेत. त्यांनी अभिनेत्री सुष्मिता सेनच्या दोन्ही मुलींना कथ्थकचं प्रशिक्षण दिलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by PRITAM S. (@pritam_shikhare)

 

News Title – Aamir Khan Daughter Ira Khan New Home After Marriage With Nupur Shikhare

महत्त्वाच्या बातम्या

पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल, हे रस्ते असणार बंद; पर्यायी मार्ग कोणते?

नागरिकांनो घराबाहेर पडताना काळजी घ्या! उन्हाचा पारा वाढणार, हवामान विभागाकडून हायअलर्ट

घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचून घ्या!

भगवान शंकराच्या कृपेने ‘या’ राशींच्या समस्या सुटणार!

“मोदींनी कोल्हापुरात भडकाऊ भाषण केलं, तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न केला”