तापमानात वाढ होणार; ‘या’ भागांना हवामान विभागाचा मोठा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maharashtra Weather Update | होलिका दहनानंतर राज्यात तापमानात वाढ होताना दिसत आहे. उन्हाचा पारा प्रचंड वाढत आहे. आता तर सकाळी आणि रात्रीही उष्णता वाढली आहे. त्यामुळे घामाच्या धारा सुटत आहेत. सकाळपासून उष्ण वारे वाहत असल्याने दमटपणा वाढला आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडणही अवघड झालं आहे.

आता येत्या दोन दिवसांनंतर राज्यात तापमानमध्ये अजून वाढ होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात तापमानवाढीचा कल कायम आहे. बुधवारी अकोल्यामध्ये देशातील सर्वाधिक 42.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

तापमानात होणार वाढ

आता पुढील दोन दिवस तापमानवाढ कायम राहण्याचा अंदाज असून, रात्रीच्या तापमानातही (Maharashtra Weather Update ) वाढ होऊन उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. आग्नेय दिशेने येत असलेल्या आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे पुढील दोन दिवस कमाल-किमान तापमानातील वाढीचा कल कायम राहणार आहे.

काल (27 मार्च) अकोला, अमरावती, बुलडाणा, ब्रह्मपुरी, वर्धा, यवतमाळ, बीड, नांदेड, परभणी, जळगाव, जेऊर, मालेगाव, सोलापूर या ठिकाणी 40 अंश सेल्सिअस आणि त्याहून जास्त तापमानाची नोंद झाली आहे.

अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद

आता हवामान विभागाने (Maharashtra Weather Update ) जळगाव, नाशिक, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत पुढील दोन दिवस रात्रीच्या तापमानात वाढ होऊन उकाडा वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना कडक उन्हाचा सामना करावा लागणार आहे.

तसंच 30 मार्चरोजी अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर येथे हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

News Title :  Maharashtra Weather Update Temperature Increase In Marathwada And Vidarbh

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबई इंडियन्सचा खेळाडू क्वेना मफाका कोण आहे? वय ऐकून व्हाल थक्क

जिओच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; कंपनीने आणला सर्वात स्वस्त प्लॅन

निता अंबानींचा क्रिकेटमधला इंटरेस्ट संपला, चाहत्यांनी घेतली मुंबईच्या मालकांची फिरकी

‘ती’ चूक मुंबई इंडियन्सला पडली महागात; नंतर ट्रेव्हिस हेड थांबलाच नाही!

Video: हार्दिक पांड्याला रोहितच्या चाहत्यांकडून पुन्हा एकदा दणका, हैदराबादमधील हे 3 व्हिडीओ एकदा पाहाच