SRH v MI | IPL 2024 च्या 8 व्या सामन्यात, मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र या मोसमातील पहिलाच सामना खेळणाऱ्या ट्रॅव्हिस हेडने हा निर्णय चुकीचा ठरवला. ट्रॅव्हिस हेडने या डावात केवळ 24 चेंडूंचा सामना केला. मात्र यादरम्यान त्याने आपल्या स्फोटक फलंदाजीने मोठे विक्रम मोडीत काढले आहेत.
ट्रेव्हिस हेड थांबलाच नाही
या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने 24 चेंडूंचा सामना करत 62 धावा केल्या. यादरम्यान त्याने 258.33 च्या स्ट्राईक रेटने 9 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याचवेळी त्याला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी केवळ 18 चेंडू लागले. यासह तो मुंबईविरुद्ध सर्वात जलद अर्धशतक ठोकणारा तिसरा फलंदाज ठरला.
ट्रॅव्हिस हेडच्या आधी ऋषभ पंतनेही आयपीएलमध्ये 18 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. त्याचबरोबर मुंबईविरुद्ध सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा विक्रम पॅट कमिन्सच्या नावावर आहे. पॅट कमिन्सने 14 चेंडूत ही कामगिरी केली होती.
SRH v MI | ‘ती’ चूक मुंबई इंडियन्सला पडली महागात
हेडला लवकर आऊट करण्याची सुवर्णसंधी मुंबईला होती. मात्र मुंबईला टीम डेव्हिडची एक चूक तब्बल 57 धावांनी महागात पडली. टीम डेव्हिडने हैदराबादच्या डावातील दुसऱ्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर हेडचा कॅच सोडला. हार्दिकने टाकलेल्या दुसऱ्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर हेडला कॅच आऊट करण्याची संधी चालून आली होती. मात्र ही संधी डेव्हिडने गमावली.
हेडने झंझावाती खेळी करत पावरप्लेचा फायदा घेतला. हेडने मैदानात चौफेर फटकेबाजी केली. हेडने 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर हेडने 13 धावा जोडल्या. मात्र अखेर हेड 62 धावांवर आऊट झाला.
या खेळीनंतर ट्रॅव्हिस हेड सनरायझर्स हैदराबादसाठी सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा दुसरा फलंदाज बनला आहे. त्याचवेळी अभिषेक शर्माने याच सामन्यात 16 चेंडूत अर्धशतक झळकावून हा विक्रम आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
समोरची व्यक्ती खोटं बोलतीये की नाही?, ‘या’ 6 टिप्सद्वारे ओळखा
‘विराट काकाच्या मुलीला डेट करायचं’, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
सर्वात मोठी बातमी! भाजपकडून खासदार नवनीत राणांना उमेदवारी जाहीर
“30 तारखेपर्यंत…”; लोकसभा निवडणुकीबाबत जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट