सर्वात मोठी बातमी! भाजपकडून खासदार नवनीत राणांना उमेदवारी जाहीर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | भाजपकडून खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना आज अखेर अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नवनीत राणा या भाजपच्या अधिकृत उमेदवार असणार आहेत.

भाजपकडून याआधी 23 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने याआधी दोन टप्प्यात उमेदवारी जाहीर केली होती. पहिल्या यादीत 20 उमेदवारांची नावे होती. तर दुसऱ्या यादीत तीन उमेदवारांची नावे होती. आता तिसऱ्या यादीत नवनीत राणा यांचं एकमेव नाव आहे.

भाजपकडून नवनीत राणांना उमेदवारी जाहीर

नवनीत राणा यांच्या उमेदवारीला आमदार बच्चू कडू आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्याकडून विरोध केला जात होता. नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. आपला नवनीत राणा यांना विरोध कायम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

बच्चू कडूंचा विरोध कायम

आता बोलण्यासारखे काहीही उरलेले नाही, अमरावती लोकसभेच्या (Amravati Loksabha) निकालात आता आम्ही दाखवून देऊ, असा गर्भित इशारा यावेळी बच्चू कडू यांनी दिला.

भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी देऊन त्यांचं काम केलं आहे. आता आम्ही आमचं काम करु. नवनीत राणा यांना आमचा विरोध कायम राहील. आता कोणाकडे नाराजी मांडण्याचा प्रश्न येत नाही. सध्या तरी आम्ही अमरावतीपुरता विचार करु. महायुती आणि विशेषत: भाजपला आमची गरज नाही, असंही बच्चू कडू म्हणालेत.

गेल्या काही दिवसांपासून नवनीत राणा यांना भाजपकडून तिकीट दिले जाणार, अशी जोरदार चर्चा होती. त्यांनी नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली होती. मात्र, अमरावतीच्या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ इच्छूक होते. मला राजकारण सोडावे लागले तरी मी नवनीत राणांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका अडसूळ यांनी घेतली होती.

महत्त्वाच्या बातम्या- 

“30 तारखेपर्यंत…”; लोकसभा निवडणुकीबाबत जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट

शरद पवार भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत; ‘हा’ बडा नेता हाती घेणार तुतारी

मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर अन् वसंत मोरे दिसले एकत्र, ‘त्या’ फोटोमुळे चर्चांना उधाण

“नुसत्याच निष्ठेच्या बाता…,”; रूपाली पाटील ठोंबरेंचा अमोल कोल्हेंना टोला

सुनेत्रा पवारांची अजित पवारांसाठी खास पोस्ट, म्हणाल्या…