शरद पवार भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत; ‘हा’ बडा नेता हाती घेणार तुतारी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Madha Lok Sabha | लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. उमेदवारांच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रिया सुरू आहे. अशात भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे. भाजपचे काही नेते शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे. यामुळे आता पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या माढा मतदारसंघाची (Madha Lok Sabha) जोरदार चर्चा आहे.

सोलापूरचे मोहिते-पाटील हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. अशी माहिती विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी दिली आहे. यामुळे माढा मतदारसंघामध्ये (Madha Lok Sabha) भाजपची अवघड परिस्थिती पाहायला मिळणार आहे. विजयसिंह मोहिते पाटील, धैर्य़शील मोहिते पाटील आणि जयसिंह मोहिते पाटील शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी चिन्हावर लढणार असल्याची चर्चा आहे. माढा मतदारसंघामध्ये (Madha Lok Sabha) धैर्यशील यांना भाजपकडून उमेदवारी न दिल्याने ते नाराज होते. त्यांनी प्रचारास सुरूवात केली होती. मात्र धैर्यशील एकतर अपक्ष लढतील, अशी चर्चा होती. मात्र आता धैर्य़शील मोहिते पाटील हे उद्या शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे ते तुतारी चिन्हावर लढणार असल्याची चर्चा आहे.

रणजितसिंह भाजपमध्येच राहणार

विजयसिंह मोहिते पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून रणजितसिंह हे भाजपमध्येच राहणार आहेत. तर इतर मोहिते पाटील परिवार शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

मोहिते पाटील विरूद्ध रणजितसिंह निंबाळकर

मोहिते पाटील विरूद्ध रणजितसिंह निंबाळकर यांच्यामध्ये मोठी लढत होणार आहे. ही लढत तुल्यबळ होणार असल्याची शक्यता आहे. मोहिते पाटील यांनी मागील लोकसभेमध्ये 1 लाखांहून अधिक मताधिक्य दिलं होतं. यामुळे मोहिते पाटील यांची देखील मोठी ताकद आहे. तर दुसरीकडे रणजितसिंह यांच्याकडे माढा, माळशिरस, सांगोला, करमाळा, माण खटाव तालुक्याचे आमदार आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha) धैर्यशील मोहिते पाटील लढण्यासाठी इच्छूक होते. मात्र भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे धैर्यशील नाराज झाले. यामुळे मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

News title – Madha Lok Sabha In Mohite Patil Will Enter In Sharad pawar Group

महत्त्वाच्या बातम्या

सिनेमात काम करणार?; अमित ठाकरेंनी अखेर सांगूनच टाकलं

“जनतेच्या मनातील मोदी कसे पुसणार?”, रक्षा खडसेंचा नणंद रोहिणी खडसेंना टोला

महायुतीकडून राज्यातील स्टार प्रचारकांची यादी जाहीर; ‘हे’ बडे नेते करणार प्रचार

पत्नीला सेकंड हँड म्हणणं पतीला पडलं महागात, भरावा लागला इतका दंड

वंचित बहुजन आघाडीची पहिली उमेदवार यादी जाहीर, प्रकाश आंबेडकर कुठून लढणार?