सिनेमात काम करणार?; अमित ठाकरेंनी अखेर सांगूनच टाकलं

Amit Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Amit Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे नेहमी चर्चेत असतात. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या अमित ठाकरे चर्चेत आहेत. राज्यातील युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. मनसे विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले आहेत.

अमित ठाकरे (Amit Thackeray) हे नेहमी चर्चेत असतात. त्यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली त्यामध्ये त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी निसंकोचपणे उत्तरं दिली आहेत. त्यांना मुलाखतीत एक प्रश्न विचारला त्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अमित ठाकरेंना (Amit Thackeray) चित्रपटामध्ये काम करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावर अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सिनेमात काम करण्यासाठी कोणी दिली ऑफर?

काही वर्षांआधी त्यांना एका मराठी सिनेमाची ऑफर आली होती. त्याबाबत मुलाखतीमध्ये विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी उत्तर दिलं. “महेश मांजरेकर साहेबांना एकदा बोलले होते हे खरं आहे. तेव्हा महेश मांजरेकरांनी म्युझिक ऐकवलं होतं. तेव्हा मी राजकारणामध्ये नव्हतो. माझं हे पॅशन आहे. मांजरेकर सर आले आणि म्हणाले की ‘एफ यु’मध्ये काम करणार का? तेव्हा आईला विचारलं तर ती म्हणाली की बाबांना विचार, बाबांनी स्टेजवर उत्तर दिलं,” असं अमित ठाकरे म्हणाले.

“आधी लोकं घरी यायची तेव्ही मी लोकांना ऑबजर्व करायचो. तेव्हा लोकांना समाधान होतं की मी या राज्यामध्ये राहत आहे. पण आता लोकांच्या चेहऱ्यावर ते हावभाव नाहीत, हास्य लोप पावत चाललं आहे. ते हास्य परत आणायचं आहे,” असं अमित ठाकरे म्हणाले.

विचारांचा वारसा की कौटुंबिक वारसा?

विचारांचा वारसा की कौटुंबिक वारसा? असा प्रश्न अमित ठाकरे यांना विचारण्यात आला तेव्हा अमित ठाकरे यांनी “विचारांचा वारसा आहे जो आहे तो आहे,” असं उत्तर दिलं. “जसे बाबा बाळासाहेब ठाकरे यांना ऑबजर्व्ह करायचे तसाच मी त्यांना ऑबजर्व्ह करतो. माझ्यात काही चुका होत असतील तर त्या माझ्या स्वाभावात होत असतील. पण माझ्या विचारात कधीच त्या चुका होत नाहीत”, असं अमित ठाकरे म्हणाले.

त्यानंतर अमित ठाकरे यांना महाराष्ट्रात युवकांना काय हवं आहे? असा प्रश्न विचारला, तेव्हा अमित ठाकरे यांनी उत्तर दिलं. “बेसिक गरजा आहेत. ग्रामीण भागात बघितलं तर त्यांना शाळेत जाता येत नाही कारण शाळेत जाताना मध्ये नदी येते. राज्य आणि देशाची जनसंख्या हा मूळ मुद्दा आहे. कॅनडाहून मुंबईची लोकसंख्या अधिक आहे. आपण कुठं चाललोय हे लक्षात आलं पाहिजे”, असं अमित ठाकरे म्हणाले आहेत,

News Title – Amit Thackeray Will Enter In Film Industry

महत्त्वाच्या बातम्या

“श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण…”; सुनेत्रा पवारांची पोस्ट चर्चेत

बारामतीत उमेदवार बदलणार?; अजित पवारांचं मोठं वक्तव्य

बच्चन कुटुंबाच्या फॅमिलीफोटोत ऐश्वर्या राय गायब; अखेर सत्य आलं समोर

‘या’ 5 गोष्टींचं पालन केलं तर घरात नेहमी लक्ष्मीची कृपा राहील!

“सच्च्या मराठ्यांनी जरांगेंना शिव्या…”; बारस्करांच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ