बच्चन कुटुंबाच्या फॅमिलीफोटोत ऐश्वर्या राय गायब; अखेर सत्य आलं समोर

Aishwarya Rai Abhishek Bachchan celebrated Holi 

Aishwarya Rai | अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत आहेत. पाहायला गेलं तर, बच्चन कुटुंबातील कुणीच यावर अधिकृत अशी प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, माध्यमामध्ये लवकरच ऐश्वर्या अभिषेकपासून विभक्त होणार, अशी अनेक वृत्त झळकून आली. तर दुसरीकडे ऐश्वर्या कुटुंबासोबत अनेक ठिकाणी दिसून आली आहे.

काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सेरेमनीमध्ये दिसून आली होती. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील असंख्य सेलिब्रिटींनी हजेरी लावली. त्यात बच्चन कुटुंब देखील संपूर्ण परिवारासह येथे उपस्थित होतं.

ऐश्वर्या-अभिषेक एकत्र दिसून आले

अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) व लेक आराध्या, श्वेता बच्चन नंदा आणि तिची मुलं अगस्त्य व नव्या नवेली या सर्वांनी जामनगरमधील कार्यक्रमात एकत्र हजेरी लावली होती. आता ऐश्वर्या कुटुंबासोबत आनंद लुटताना दिसून आली होती. तर काल (25 मार्च) संपूर्ण देशात धूलिवंदन साजरा करण्यात आला.

यात बच्चन कुटुंबही मागे नव्हतं. ऐश्वर्याने पती अभिषेक आणि मुलगी आराध्यासोबत होळी साजरी केली. नुकतंच त्यांच्या होळी सेलिब्रेशनचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये तिघेही धमाल करताना दिसले आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक यांचे हे फोटो पाहून चाहते आनंदित झाले आहेत.

सोशल मिडियावर ऐश्वर्याचे फोटो व्हायरल

या फोटोमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र होळी साजरी करताना आणि एकमेकांच्या रंगात बुडताना दिसल्याने चाहते देखील सुखावले आहेत. त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. ऐश्वर्या अभिषेक सोबत खूपच आनंदी दिसून येत आहे. त्यामुळे सध्या तरी यांच्या घटस्फोटाच्या चर्चा या फोल ठरल्या आहेत.

दुसरीकडे अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर होळी सेलिब्रेशनचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये, नव्या तिचे आजोबा अमिताभ बच्चन, आजी जया बच्चन आणि आई श्वेता बच्चन नंदा यांच्यासोबत होळी साजरी करताना दिसत आहे. पण, या फोटोंमध्ये ऐश्वर्या राय, आराध्या बच्चन आणि अभिषेक बच्चन कुठेच दिसले नाही. त्यामुळे यांच्यात पुन्हा काहीतरी बिनसल्याची चर्चा होती.

मात्र, नंतर त्यांच्या अनुपस्थितीचे कारण समोर आलं. नव्या फोटो काढत असताना ऐश्वर्या, अभिषेक आणि त्यांची लेक हे आपल्या मित्र-मंडळीसोबत होळी साजरी करण्यासाठी बाहेर गेले होते. त्यामुळे त्यांनी एकत्र फोटो काढले नाहीत.

News Title- Aishwarya Rai Abhishek Bachchan celebrated Holi 

महत्त्वाच्या बातम्या –

लेकीला उमेदवारी न दिल्यानं विजय वडेट्टीवर नाराज?

लग्नाला 13 वर्षे झाली, गुड न्यूज कधी देणार? प्रिया बापट म्हणाली…

‘त्यावेळी जातीचे रंग’; कुशल बद्रिकेची पोस्ट व्हायरल

प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न?, ‘त्या’ फोटोंमुळे चर्चांना उधाण

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .