लग्नाला 13 वर्षे झाली, गुड न्यूज कधी देणार? प्रिया बापट म्हणाली…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Priya Bapat | मराठी आणि हिंदी सिनेमा, नाटक, वेबसीरिजमध्ये आपल्या अभिनयाने चाहत्यांना प्रेरित करणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट (Priya Bapat) आहे. तिनं आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. प्रिया बापट (Priya Bapat) ही कोणत्या न् कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असते. मागील काही महिन्यांआधी तिनं एका बीचवर बिकनी परिधान केली होती. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावरून नेटकऱ्यांनी तिला संस्कृतीवरून आणि तिच्या पेहरावावरून टोकलं होतं.

प्रिया बापटलाएका मुलाखतीत लग्नाला 13 वर्षे झाली, गुड न्यूज कधी देणार? असा सवाल केला. त्यावर तिनं मुलाखतीमध्ये उत्तर दिलं आहे.

बाळाबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नाला कसं हाताळतेस?

बाळाबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नाला कसं हाताळतेस? असा प्रश्न प्रिया बापटला विचारण्यात आला त्यावर प्रिया बापट म्हणाली की, “तुमचं लग्न झालं असेल आणि तुम्हाला बाळ असेल, तरच तुमचं आयुष्य पूर्ण झाल्यासारखं वाटेल का?”, असा सवाल आता तिनं केला आहे. “ज्यांना मुलं नकोत. त्या आनंदी आहेत, त्यांना त्यांचं आयुष्य पूर्ण आहे”, असं वाटत असल्याचं प्रिया बापट (Priya Bapat) म्हणाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

काय म्हणाली प्रिया बापट?

पुढे प्रिया बापट म्हणाली की “आमच्या कपल फोटोवर बाळाबाबत कमेंट असतात. उमेशच्या फोटोवर या कमेंट्स नसतात. अर्थात मी महिला असल्यानं ही अपेक्षा माझ्याकडून आहे. जेव्हा मला वाटेल बाळ हवंय तेव्हा विचार करेन. जर मला बाळ नको असेल तर मी त्याचा फारसा विचार नाही करणार,” असं प्रिया बापट (Priya Bapat) म्हणाली.

एका नाटकाच्या प्रयोगानंतर प्रियाला एक महिला भेटण्यासाठी आली. त्या महिलेनं प्रियाशी संवाद साधला. त्यावेळी  त्या महिलेनं प्रिया बापटला गुड न्यूज कधी देणार असा प्रश्न विचारला. त्यावर प्रिया बापट म्हणाली की आताच मला अवॉर्ड मिळाला आणखी कोणती न्यूज द्यायची, असं प्रिया बापट म्हणाली.

त्यानंतर त्या महिलेनं थेट प्रिया बापटला सतत बाळाबाबत विचारले त्यावर पुन्हा एकदा प्रिया बापटनं उत्तर दिलं. काकू हा प्रश्न मला माझ्या आईने देखील एवढ्या वेळा विचारला नाही, असं प्रिया बापट म्हणाली.

News Title – Priya Bapat Statement On Her Pregnancy Question

महत्त्वाच्या बातम्या

प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न?, ‘त्या’ फोटोंमुळे चर्चांना उधाण

“काळे झेंडे दाखवणाऱ्या मुलांवर गुन्हा….”; पंकजा मुंडेंची पोलिसांकडे मोठी मागणी

‘बीडचं पार्सल परत पाठवू’; प्रणिती शिंदेंचा पहिला हल्ला

‘ही तर राहाची जुळी बहीणच दिसतेय’, ‘तो’ फोटो पाहून चाहतेही चकित

आहेर आणू नका पण मोदींना…; लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल