Kushal Badrike | देशभरात आज होळी सण साजरा केला जात आहे. मनोरंजन विश्वात सक्रिय असलेल्या कलाकारांनी सोशल मीडियावर होळीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. त्याची सर्वत्र चर्चा आहे. मराठी अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) याने देखील सोशल मीडियावर होळीचे फोटो शेअर केले आहेत. त्याने केलेल्या पोस्टची सर्वत्र चर्चा आहे.
अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. तो नेहमी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतो. होळीचे फोटो शेअर करत त्यानं आपल्या लहानपणीतील चाळीतली आठवण सांगितली आहे. त्याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
काय होती कुशल बद्रिकेची पोस्ट?
“माझ्या आयुष्याची होळी गेली कित्येक वर्ष “फ्लॅट” संस्कृतीत पेटत्ये, पण माझी खरी होळी रंगली ती माझ्या बालपणी आमच्या “चाळीत”. माझे पप्पा पहाटे चारला उठायचे आणि दिड-दोनशे फुगे पाण्याने भरून ठेवायचे. मग रंग भरल्या पिचकारीची बंदूक आणि फुग्यांचे बॉम्ब घेऊन आमची वानरसेना दिसेल त्याच्यावर तुटून पडायची. त्यावेळी जातीचे रंग थोडे फिकट आणि होळीचे रंग थोडे गडद होते, म्हणून कदाचित जगण्यात जे रंग उतरले त्याने अख्खं आयुष्य रंगीत करुन टाकलं.”
“आता मुलांना फुगे भरून देताना गाठी मारून गुलाबी झालेलं “पप्पांचं बोट” आपल्याच हाताला फुटलंय असं वाटतं आणि आता होळीत आपल्याला फुगे भरून देणारं कुणी नाही ही जाणीव ठुसठुसत राहते बोटभर”, अशी भाविनक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली.
View this post on Instagram
नेटकऱ्यांची प्रतिक्रिया
कुशल बद्रिकेनं सोशल मीडियावर आपल्या कुटुंबाचे फोटो शेअर केले आहेत. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते. अनेकांनी पोस्टवर कमेंटचा वर्षाव केला आहे. अनेकांनी कमेंट करत जुने दिवस आठवले, ते गोल्डन दिवस आठवले अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी दिल्यात.
कुशल बद्रिकेनं अनेक मराठी चित्रपटांमधून काम केलं आहे. चला हवा येऊ द्या या विनोदी शोमुळे कुशल बद्रिके महाराष्ट्र नाहीतर देशभरात घरोघरी पोहोचला आहे. दरम्यान काही दिवसांआधी चला हवा येऊ द्या शो बंद झाला आहे. कुशल बद्रिक आता आगामी नवीन चित्रपटांमध्ये वेगवेगळे प्रयोग करू पाहत आहे.
News Title – Kushal badrike holi Post
महत्त्वाच्या बातम्या
‘बीडचं पार्सल परत पाठवू’; प्रणिती शिंदेंचा पहिला हल्ला
‘ही तर राहाची जुळी बहीणच दिसतेय’, ‘तो’ फोटो पाहून चाहतेही चकित
आहेर आणू नका पण मोदींना…; लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल
पीएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट; या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही
“मी सोलापूरची लेक म्हणून…”, प्रणिती शिंदेंचं थेट राम सातपुतेंना पत्र