प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न?, ‘त्या’ फोटोंमुळे चर्चांना उधाण

Taapsee Pannu | बॉलिवूडमधील अनेक कलाकार विवाहबंधनात अडकत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांनी लग्न केलं. तसंच पुलकित सम्राट आणि कृति खरबंदा यांनीही नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. आता अजून एका अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा होत आहे.

अभिनेत्री तापसी पन्नूही लग्नाच्या तयारीत असल्याच्या चर्चा होत्या. आता तापसीच्या लग्नाशी संबंधित काही माहिती समोर आली आहे. काही मिडिया रिपोर्टनुसार, तापसीने बॉयफ्रेंड मॅथियास बो याच्यासोबत लग्न केलं असल्याची माहिती मिळत आहे.

तापसी पन्नूने गुपचूप उरकलं लग्न?

तापसी (Taapsee Pannu ) आणि बॉयफ्रेंड मॅथियास बो यांनी 23 मार्च रोजी लग्न केलं असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांनी उदयपूर येथे लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. तापसी पन्नू आणि माजी ऑलिम्पिक पदक विजेता मॅथियास बो यांनी फक्त कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केलं अशी चर्चा आहे. तापसीने गुपचुप आपला लग्नसोहळा उरकला आहे. त्यांनी बॉलीवुडमधील कुणालाच लग्नाचं निमंत्रण दिलं नाही. फक्त काही जवळच्या लोकांचा लग्न सोहळ्यात समावेश होता. यात अनुराग कश्यप आणि कनिका ढिल्लों यांचा समावेश होता.

तापसीने दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या ‘मनमर्जियां’ आणि ‘दोबारा’ या सिनेमांत काम केलं आहे. अद्याप तापसी आणि मॅथियास यांच्या लग्नाबाबत अधिकृत अशी कोणतीच माहिती समोर आली नाही. त्या दोघांनीही याबाबत अद्याप कोणतंच भाष्य केलं नाहीये. मात्र, काही रिपोर्टनुसार त्यांनी लग्न केलं असल्याची माहिती आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pavail Gulati (@pavailgulati)

तापसीने बॉयफ्रेंड मॅथियाससोबत लग्न केल्याची चर्चा

तापसी (Taapsee Pannu ) तिच्या प्रियकरासोबत सुमारे 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे आणि आता त्यांनी 2024 मध्ये लग्न केलं असल्याची माहिती आहे. तापसीने एका मुलाखतीमध्ये मॅथियासबद्दल सांगितलंही होतं. मी गेल्या दहा वर्षांपासून एकाच व्यक्तीसोबत आहे. मी तेरा वर्षांपुर्वी फिल्मी दुनियेत प्रवेश केला. जेव्हा मी बॉलीवूडमध्ये डेब्यू केला तेव्हा माझी भेट त्या व्यक्तीशी झाली, असं तापसी म्हणाली होती.

दरम्यान,अभिनेत्री तापसीने बॉलीवूडमध्ये ‘चश्मे बद्दूर’ या चित्रपटाद्वारे एंट्री केली होती. यानंतर तीने थप्पड, हसीना दिलरुबा, जुडवा 2 आणि डंकी या मोठ्या चित्रपटात काम केलं आहे. आता तापसी तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे.

News Title- Talks of Taapsee Pannu getting married

महत्वाच्या बातम्या- 

पीएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट; या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही

“मी सोलापूरची लेक म्हणून…”, प्रणिती शिंदेंचं थेट राम सातपुतेंना पत्र

राज्यात उन्हाचा कडाका वाढणार, हवामान विभागाचा इशारा

गुड न्यूज! सोन्याच्या किंमती घसरल्या; जाणून घ्या आजचे दर

आज RCB विरुद्ध PBKS यांच्यात रंगणार चुरशीची लढत; अशी असेल संभाव्य प्लेयिंग 11