राज्यात उन्हाचा कडाका वाढणार, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Weather

Maharashtra Temperature | होळीनंतर उन्हाचा कडाका अजूनच वाढणार आहे. गेल्या दोन आठवड्यात महाराष्ट्रातील विदर्भाला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलं. विदर्भाकडील गोंदिया, गडचिरोली या भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली होती.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलेल्या या भागात दोन-तीन दिवसांपासून तापमानात बदल होताना दिसत आहे. पाऊस आणि गारपिटीमुळे तापमानात घट झाली होती. मात्र सध्या पाऊस थांबला आहे. यामुळे तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. विदर्भात तापमान 36 ते 37 अंशांच्या आसपास गेलं आहे.

राज्यात आता सकाळीच उन्हाचे चटके जाणवत आहेत. सकाळी दहा वाजेपासूनच उन्हाच्या झरा वाहत आहेत. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि बिहार या तीन राज्यांत मार्च महिन्यातील तापमान वाढ 40 अंश सेल्सियस नोंदवण्यात आलं आहे.

राज्यात उन्हाचा कडाका वाढणार

कोरड्या हवामानामुळे (Maharashtra Temperature) कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तामिळनाडू ते विदर्भापर्यंत द्रोणीय स्थिती कायम आहे. याचा प्रभाव कमी होत चालला आहे. त्यामुळे उकाडा वाढला आहे. कमाल तापमानातही वाढ होत असल्याने शरीराची लाही लाही होत आहे.

मुंबई-पुण्यात तापमानमध्ये अधिकच वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे घराबाहेर पडणं देखील अवघड झालं आहे.काही ठिकाणी तर घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आता उन्हाचा कडाका अजूनच वाढणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय.

नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, (Maharashtra Temperature) येत्या 27 मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि विदर्भासह राज्यातील अनेक भागात उन्हाचे चटके अधिक जाणवण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

News Title : Maharashtra Temperature News Update

महत्त्वाच्या बातम्या-

महत्वाची बातमी! एप्रिलमध्ये ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद

नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रेक्षकांनी हार्दिक पांड्याची काढली इज्जत, पाहा Video

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची महागडी गाडी गेली चोरीला

भर मैदानात हे काय घडलं, रोहित आणि बुमराह थेट हार्दिक पांड्याला का भिडले?

लाईव्ह सामन्यात झाला खेळ, हार्दिक पांड्यासमोर कुत्र्याची एन्ट्री! पाहा Video

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .