लाईव्ह सामन्यात झाला खेळ, हार्दिक पांड्यासमोर कुत्र्याची एन्ट्री! पाहा Video

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

MI vs GT | आयपीएल 2024 च्या हंगामात मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पांड्या पहिल्यांदाच अहमदाबादच्या मैदानात गुजरातविरुद्ध खेळण्यासाठी उतरला. गुजरातने मुंबईला विजयासाठी 169 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईला 9 विकेट्स गमावून 162 धावाच करता आल्या. गुजरातने यासह हा सामना 6 धावांनी जिंकला.

गुजरातचा नवा कर्णधार शुभमन गिल याने विजयासह सुरुवात केली. तर, परंपरेनुसार मुंबई इंडियन्सने हा सामना गमावला. या लाईव्ह सामन्यादारम्यानच अशी गोष्ट घडली ज्यामुळे मुंबईचा कर्णधार हार्दिक पाहातच राहिला. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर तूफान व्हायरल होत आहे.

झालं असं की, लाइव्ह मॅच दरम्यान हार्दिक गोलंदाजी करणार होता. तेव्हा अचानकच स्टेडियममध्ये एक कुत्रा दिसला आणि हार्दिक उभा राहून त्याच्याकडे बघतच राहिला. गुजरातविरुद्धच्या 15व्या षटकात हार्दिक पांड्या गोलंदाजी करत होता. षटकाचा पहिला चेंडू टाकल्यानंतर तो दुसरा चेंडू टाकणार होता. त्यानंतर लाईव्ह मॅच दरम्यान अचानक एक कुत्रा मैदानात धावताना दिसला आणि तो हार्दिक पांड्यासमोर गेला.

लाईव्ह सामन्यात मैदानात कुत्र्याची एंट्री

याचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सामन्याबद्दल (MI vs GT) बोलायचं झालं तर, गुजरातकडून तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या साई सुदर्शनने 39 बॉलमध्ये तीन चौकार आणि एक षटकारासह 45 धावा केल्या. तर शेवटी राहुल तेवतियानेही 15 बॉलमध्ये दोन चौकार आणि एका षटकारासह 22 धावांची खेळी केली.

व्हिडिओ तूफान व्हायरल

मुंबईच्या गोलंदाजीसमोर गुजरातचा (MI vs GT) संघ 20 षटकांत 6 बाद 168 धावाच करू शकला. मुंबईसाठी जसप्रीत बुमराहने चार षटकांत 14 धावांत सर्वाधिक तीन बळी घेतले, तर कोएत्झीनेही दोन बळी घेतले. मात्र, सामना गुजरातने जिंकला. गुजरातच्या संघाने अखेरच्या षटकात मुंबई इंडियन्सवर 8 धावांनी दणदणीत विजय नोंदवला.

मुंबईला 6 बॉलमध्ये 19 धावांची गरज असताना उमेश यादवला गोलंदाजी सोपवण्यात आली. पहिल्या बॉलवर पांड्याने षटकार आणि दुसऱ्या बॉलवर चौकार लगावला. मात्र, पुढच्या दोन बॉलवर पांड्या आणि चावलाला बाद केल्याने गुजरात संघाने विजय नोंदवला.

News Title : A dog entered the field in the MI vs GT match

महत्त्वाच्या बातम्या-

कंगणाची राजकारणात एंट्री, भाजपने दिलं लोकसभेचं तिकीट, पाहा कोणत्या मतदारसंघातून लढणार

मैदानावर पंड्याने रोहितसोबत केलं असं काही की, चाहते म्हणाले ‘इतका माज बरा नाही’

लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगेंचा मोठा निर्णय!

संभाजीराजेंची वडिलांसाठी भावूक पोस्ट, म्हणाले ‘राजघराण्याची झूल न पांघरता’

बच्चू कडूंची अमरावतीत मोठी खेळी; मुख्यमंत्र्यांनी फोन करत थेट भेटायलाच बोलवलं