बच्चू कडूंची अमरावतीत मोठी खेळी; मुख्यमंत्र्यांनी फोन करत थेट भेटायलाच बोलवलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bachcu Kadu | आगामी लोकसभा निवडणूक आता जवळ आली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजप नेत्या नवनीत राणा यांना उमेदवारी देण्याच्या चर्चा आहे. जर नवनीत राणा यांना उमेदवारी दिली तर आपण पाठिंबा द्याल का? असा सवाल माध्यमांनी बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना केला. त्यावर बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी स्पष्टपणे नाही असं उत्तर दिलं.

आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) अमरावती मतदारसंघातून वेगळा उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. 3 एप्रिलला उमेदवाराचा अर्ज भरणार आहोत असं त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.

दरम्यान अर्ज भरणारा उमेदवार हा बच्चू कडू यांच्या पक्षाचा नाही, मग तो भाजपचा तर नसेल ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजपचा उमेदवार असेल तर भाजप नेता विरूद्ध भाजपचा उमेदवार अशी लढत होऊ शकते. याबाबत बच्चू कडू यांनी नेत्याचं नाव सांगितलं नाही. याप्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडूंना (Bachchu Kadu) फोन केला आहे.

एकनाथ शिंदे यांचा बच्चू कडूंना फोन

माध्यमांशी संवाद साधल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना फोनद्वारे संपर्क केला आहे. यावेळी बच्चू कडू यांना 26 मार्चला मुंबईत भेटीसाठी बोलावल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. अमरावतीच्या लोकसभेच्या जागेबाबत बच्चू कडूंना चर्चा करण्यासाठी बोलावलं आहे.

काय म्हणाले बच्चू कडू?

“आम्ही अमरावतीची जागा लढवत आहोत. सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ज्या नवनीत राणाने आपल्याला अपमानित केलं. काय काय बोलल्या ते सांगणं जरा कठिणच आहे. त्या काय म्हणाल्या ते मी सांगू शकत नाही. आता उमेदवार असताना सर्व लांडगे फांडगे प्रचाराला येतील. उमेदवार असताना असं वक्तव्य केलं जात असेल तर हे सहन करण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता नाही,” असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

“आपण राजकारणामध्ये झिरो झालो तरीही चालेल, पण शरणांगती पत्करायची नाही. कार्यकर्ते स्वत:हून फोन करत आहेत आणि पक्ष सोडण्याची भाषा करत आहेत. आघाडीकडून जागा मागा पण राणांचा प्रचार करायचा नाही.” असं कार्यकर्त्यांनी म्हटलं असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.

News Title – Bachchu Kadu Recieved Phone Calls Of Eknath Shinde

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसला धक्क्यावर धक्के; आणखी एका मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

पोस्टाची भन्नाट योजना; पैसे होतील डबल

लग्न करण्याआधी चाणक्यांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी हमखास तपासा

बच्चू कडूंचा मोठा निर्णय?; महायुतीची डोकेदुखी वाढली

महायुतीचा मोठा निर्णय; जानकरांचा आनंद गगनात मावेना