संभाजीराजेंची वडिलांसाठी भावूक पोस्ट, म्हणाले ‘राजघराण्याची झूल न पांघरता’

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sambhaji Raje Post | आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. राज्याच्या राजकारणामध्ये अनेक ट्वीस्ट घडताना दिसत आहे. कोल्हापूरच्या जागेवर कोणता उमेदवार द्यायचा याबाबत महाविकास आघाडीमध्ये संभ्रम होता. मात्र महाविकास आघाडीच्या चर्चेनंतर कोल्हापूर ही जागा काँग्रेसकडे आली. त्यानंतर कोल्हापूरच्या जागेवर कोणता उमेदवार उभा करायचा? असा मोठा सवाल काँग्रेस पुढं उपस्थित होता. राजर्षी शाहू महाराजांचे वंशज शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर झाली. यामुळे शाहू महाराज यांचे पुत्र संभाजीराजे भावूक झाले आहेत. (Sambhaji Raje Post)

आपल्या वडिलांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली असल्याने संभाजीराजे खूश आहेत. काँग्रेसकडून कोल्हापूरच्या जागेवर संभाजीराजे यांनी लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण काँग्रेस पक्षाकडून शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे आता संभाजीराजे यांनी आपल्या वडिलांसाठी एक भावनिक पोस्ट (Sambhaji Raje Post) केली आहे. त्यांनी आपल्या वडिलांचे अभिनंदन केलं असून संभाजीराजे भारावून गेले आहेत.

काय होती पोस्ट (Sambhaji Raje Post)

“अभिनंदन बाबा… गेले तीन दिवस श्री शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारार्थ मी राधानगरी तालुक्याच्या दौऱ्यावर होतो. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेल्या व निबीड अरण्यात वसलेल्या “वाकीघोल” या अत्यंत दुर्गम भागात माझा दौरा होता. परवा रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मोबाईलला थोडी रेंज आली आणि शाहू छत्रपती महाराजांना उमेदवारी जाहीर झाल्याची बातमी दिसली. मन आनंदून गेले. लागलीच कोल्हापूरला जाऊन महाराजांना भेटण्याची इच्छा झाली. पण लगेचच जबाबदारीचीही जाणीव झाली. हातातले काम… पुढे दिलेला शब्द…. आणि पुढचा नियोजित दौरा पूर्ण करूनच कोल्हापूरला निघायचे ठरवले. आज दौरा संपवून घरी आल्यानंतर लगेचच महाराजांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.”

“तीन पक्षांनी एकत्र येत महाराजांना….”

“खरंतर तिकीटासाठी एकदाही मुंबई दिल्लीला न जाता, कुठल्याही नेत्याकडे तिकीटाची मागणी न करता, केवळ लोकभावना पाहून तीन पक्षांनी एकत्र येत महाराजांना लोकसभा लढण्याची विनंती केली. महाराजांनी आयुष्यभर राजकारणापासून व प्रसिद्धी पासून अलिप्त राहत जे जनसेवेचे कार्य केले आहे, राजघराण्याची झूल न पांघरता लोकशाहीचा पुरस्कार करण्याची जी भूमिका आयुष्यभर जपली आहे, त्याचेच हे प्रमाण आहे.”

“कोल्हापूरची जनता ठामपणे महाराजांसोबत उभी आहे. ही लोकभावनाच महाराजांच्या विजयाची शाश्वती आहे…”, अशी (x) सोशल मीडियावर संभाजीराजे यांनी आपल्या बाबांसाठी भावनिक पोस्ट (Sambhaji Raje Post) लिहिली आहे.

संभाजी महाराज यांनी आपल्या वडिलांसाठी केलेल्या पोस्टची सध्या सर्वत्र चर्चा आहे. संभाजी महाराज आपल्या वडिलांना निवडून आणण्यासाठी स्वत: प्रयत्न करणार असल्याचं संभाजी महाराज म्हणाले आहेत.

News Title – Sambhaji Raje Post About His Father Shahu Maharaj

महत्त्वाच्या बातम्या

“उदयनराजे इकडे तिकडे फिरताहेत…”; बिचुकलेचं मोठं वक्तव्य

‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकलेची सर्वात मोठी घोषणा!

‘आढळरावांना 2019 सालचा बदलाच घ्यायचा असेल तर…’; अमोल कोल्हे थेट बोलले

बायकोसोबत ‘असं’ वागत असाल तर आताच थांबा; होईल मोठं नुकसान!

प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा; महाविकास आघाडीत खळबळ