बायकोसोबत ‘असं’ वागत असाल तर आताच थांबा; होईल मोठं नुकसान!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chanakya Niti | आचार्य चाणक्य (Chanakya Niti) मानवाच्या जीवनातील अनेक बाबींवर बोलत असतात, मार्गदर्शन करत असतात. मग ते मार्गदर्शन अगदी एखाद्या विद्यार्थ्याबाबत असो, पती-पत्नीबाबत असो, समाजिक असो, अशा अनेक बाबींवर आचार्य चाणक्य भाष्य करतात. आता आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी पतीने आपल्या पत्नीसोबत कसं राहावं. पतीच्या राहण्याचा पत्नीवर काय परिणाम होईल यावर भाष्य केलं आहे.

पतीनं पत्नीशी कसं राहावं?

पती आपल्या पत्नीचे सौंदर्य पाहत असतो. पत्नी आपल्या पतीचे सौंदर्य पाहत नाही असं नाही, पण पती आपल्या पत्नीचे सौंदर्य पाहून तिला त्यापद्धतीने वागून देतो. हे काही अंशी खरं देखील आहे. पत्नीचे सौंदर्य खुललेलं असेल तर तो समाजामध्ये आपल्या पत्नीला फिरवतो. मात्र पत्नी हा दिखावा नाही असं आचार्य चाणक्य यांनी सांगितलं आहे. तिच्या शारिरीक सौंदर्यापेक्षा तिचं मन पाहा असं आचार्य चाणक्य सांगतात.

…तर पती आपल्या आयुष्यामध्ये दुखी राहिल

रूप हे देवानं दिलेली देणगी आहे. जर एखादी पत्नी दिसायला सावळी किंवा बरी असेल तर त्या पतीने पत्नीचा अपमान करू नये. कारण यामुळे पती कधीच खूश राहणार नाही. यामुळे तो आपल्या पत्नीचा अपमान करत नेहमी दुखावेल. तो बाहेर आणि घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये दुखी राहिल, असं आचार्य चाणक्य यांनी सांगितलं आहे.

पतीकडून पत्नीचं कौतुक व्हावं

एखादा पती आपल्या पत्नीच्या केवळ चुका काढत असेल. त्याची आपल्या पत्नीप्रती वाईट वागणूक असेल, तर त्याला आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेता येत नाही. तसेच प्रत्येक पत्नीला आपल्या पतीकडून कौतुकाची थाप हवी असते जर पतीने कौतुक केलं नाहीतर पती आपल्या पत्नीला आणि स्वत:ला खूश ठेवू शकत नाही.

प्रत्येक माणसामध्ये काही चांगल्या तर काही कमकुवत बाबी असतात. त्यावरून पतीने देखील आपल्या पत्नीला तिच्या कमकुवत बाबींवर बोलू नये. त्याबाबत सुधारणा कशी करता येईल याकडे लक्ष द्यावं, असं चाणक्यनीती सांगते.

पतीने आपल्या पत्नीपासून कोणतीच गोष्ट लपवू नये. पत्नी आपल्या पतीला अनेक गोष्टी सांगत असते. त्यामुळे पतीने नेहमी आपल्या पत्नीला काही गोष्टी सांगाव्यात यामुळे पत्नीला पतीबद्दल अधिक विश्वास निर्माण होतो.

News Title – Chanakya Niti | How To Treat Wife By Husband

महत्त्वाच्या बातम्या

“तो छगन भुजबळ कुठं गेला?”, मनोज जरांगेंचा पुन्हा गंभीर इशारा

“तुम्हाला बारामतीत…”; संजय राऊतांचा अजित पवारांना इशारा

‘या’ योजनेत फक्त 3000 रुपये गुंतवा आणि महिन्याला लाखो रुपये मिळवा

पुणेकरांसाठी धोक्याची घंटा!; धक्कादायक माहिती समोर

होलिकेच्या अग्नीपासून समजतो वर्षाचा शुभ आणि अशुभ अंदाज; पाहा यंदाचं वर्ष तुमच्यासाठी कस