“तुम्हाला बारामतीत…”; संजय राऊतांचा अजित पवारांना इशारा

Sanjay Raut | आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. बारामती लोकसभेकडे राज्याचं नाहीतर उभ्या देशाचं लक्ष लागलं आहे. नणंद आणि भाऊजय अशी टक्कर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये उभी फूट पडल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये लढत होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. यावेळी महाविकास आघाडीची सभा इंदापूरात सुरू असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर हल्ला चढवला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

“इंदापूरच्या प्रचारसभेसाठी मला इथं यायला मिळालं. इथं आल्यावर एक स्पष्ट झालं की पायाखालची वाळू सरकली की लोकं दहशतवादाची भूमिका घेतात. माणूस घाबरला, समोरच्याला पराभवाची भिती वाटू लागली. लोकं आपल्याला स्विकारणार नाहीत याचं भय वाटायला लागलं की मोदींचा मार्ग सुरू होतो,” अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर केली.

“तुम्हालाही मुंबई, ठाण्याला यायचंय, लक्षात ठेवा”

“धमक्या द्यायच्या पोलिसांचा वापर करायचा. आम्ही धमक्या देतो आणि घेतो सुद्धा. धमक्या आवाज बदलून दिल्या जातात. धमक्या द्यायच्या असतील तर लक्षात ठेवा तुम्हाला पण मुंबई, ठाण्याला यायचं आहे. ही मर्दांची सभा आहे, नामर्द होते ते पळून गेले,” असं म्हणत राऊतांनी हल्ला केला.

“बारामतीची लढाई ही महाराष्ट्राची लढाई”

“तुम्ही तुमचा प्रचार करा आणि निवडून येऊन दाखवा. बारामतीची लढाई ही महाराष्ट्राची लढाई आहे. प्रचाराची गरज नाही. बारामतीचे गुजरात करू पाहणार असाल तर इथे शिवसेनेचा झेंडा असेल,” असं म्हणत राऊतांनी (Sanjay Raut) खडेबोल सुनावलं आहे.

त्यानंतर राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. “फडणवीस हे तुमच्या सगळ्यांचे नेते आहेत. ते म्हणाले मी पुन्हा आलो आणि दोन पक्ष घेऊन आलो. काय हे क्वालिफिकेशन लोकं विकास घेऊ येतात,” असं म्हणत राऊत यांनी (Sanjay Raut) देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली.

त्यानंतर त्यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत भाष्य केलं. राऊत म्हणाले की “महाराष्ट्राच्या मातीत राहणाऱ्याला वाटत असेल की हर्षवर्धन यांना झोप लागत असेल, तर तो महाराष्ट्राच्या मातीत राहायच्या लायकीचा नाही. हर्षवर्धन पाटलांची अस्वस्थता जाणवते”, असं संजय राऊत म्हणाले. तसेच त्यांनी माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्याबाबतही वक्तव्य केलं. “लोकांना वाटतं की शरद पवार हे कृषीमंत्री आहेत. या भारताचा आधार शरद पवार यांच्या रूपाने बारामतीमध्ये आहे.”

News Title – Sanjay Raut Aggressive On BJP, Ajit Pawar At Indapur

महत्त्वाच्या बातम्या

श्रीकांत शिंदेंच्या विरोधात ठाकरे तगडा उमेदवार देणार; ‘या’ व्यक्तीचं नाव चर्चेत

केजरीवालांच्या कार्यकर्त्यांनी उचललं मोठं पाऊल!

महायुतीला मोठा धक्का; विजय शिवतारेंनी केली मोठी घोषणा

‘तिहारचा बॉस, मी तुमचं तुरुंगात स्वागत करतो’; सुकेश चंद्रशेखरचा पत्रातून केजरीवालांना टोमणा

KKR समोर हैदराबाद देणार आव्हान; जाणून घ्या दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग 11