‘तिहारचा बॉस, मी तुमचं तुरुंगात स्वागत करतो’; सुकेश चंद्रशेखरचा पत्रातून केजरीवालांना टोमणा

मुंबई | मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) यांनी 22 मार्च रोजी तुरुंगातून 5 पानी पत्र लिहिलं आहे. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत तुमच्या पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागेल, असं सुकेश म्हणालाय. तसेच मी तिहारचा बॉस, तुमचं तुरूंगात स्वागत करत, असंही सुकेश चंद्रशेखरने (Sukesh Chandrashekhar) म्हटलंय.

सुकेश चंद्रशेखरचा पत्रातून केजरीवालांना टोमणा

प्रिय बंधू, अरविंद केजरीवाल… नेहमीप्रमाणे सत्याचा विजय होतो. ही नव्या भारताची ताकद आहे. कायद्याच्या वर कोणी नाही याचे ज्वलंत उदाहरण. सर्वप्रथम, तिहारचे बॉस, मी तुमचं स्वागत करतो. तुमचं कट्टर प्रामाणिक विधान आणि सगळं नाटक आता संपुष्टात आलंय, असं त्याने पत्रात म्हटलंय.

25 मार्चला माझा वाढदिवस आहे. या दिवशी दुहेरी आनंद साजरा केला जाईल. तुझ्या अटकेला मी माझ्या  वाढदिवसाची सर्वोत्तम भेट मानतो. केजरीवाल जी, भाऊ, सत्य जास्त काळ लपवता येत नाही, हे तुमच्या लक्षात आलं नाही, असंही सुकेश म्हणाला आहे.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसलाही लिहिलं पत्र

तिहार तुरुंगात कैदी असलेला सुकेश चंद्रशेखर हा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिला अनेकदा पत्र लिहितो, निवेदने देतो. आता पुन्हा सुकेश याने जॅकलिनला वाढदिवसाआधी तुरुंगातून प्रेमपत्र लिहिलं आहे. जॅकलिन हिचं नवीन गाणं Yimmy Yimmy हे त्याच्यासाठी वाढदिवसाचं गिफ्ट आहे, असं त्याने म्हटलं आहे.

बेबी, गाणे ऐकून मी थक्क झालो. गाण्याचा प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ माझ्याबद्दल आहे. हे गाणं एकूणच आमची कथा आहे. मला खात्री आहे की ते ऐकणारे प्रत्येकजण सहमत असेल, असं सुकेशने पत्रात म्हटलंय.

आपल्या नात्याबद्दल लोकांना अनेक प्रश्न होते. अनेकांनी वाईट कमेंट्स केल्या होत्या. तुम्ही हे गाणे करून सर्वांना शांत केलं, असं सुकेश म्हणाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

KKR समोर हैदराबाद देणार आव्हान; जाणून घ्या दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग 11

BMW कंपनीने लाँच केली जबरदस्त फीचर्ससह कार; किंमत ऐकून व्हाल थक्क

“यातच आपली कुवत कळते, फुकटचे सल्ले…”, किरण मानेंच्या टीकेला मिटकरींचं प्रत्युत्तर

तब्बल 14 महिन्यांनी हा खेळाडू मैदान गाजवण्यास सज्ज! आज रंगणार PBKS vs DC

शिंदे गटाला खिंडार?, ‘हा’ बडा नेता अजित पवार गटात जाण्याची शक्यता