“यातच आपली कुवत कळते, फुकटचे सल्ले…”, किरण मानेंच्या टीकेला मिटकरींचं प्रत्युत्तर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Amol Mitkari | मराठी अभिनेता किरण माने सनेहमीच आपल्या सोशल मिडिया पोस्टमुळे चर्चेत असतात. त्यांनी काही दिवसांपूर्वीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे बऱ्याचदा ते राजकीय मत मांडत असतात.त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधता भलीमोठी पोस्ट केली होती.

अजित पवार यांचा रुबाब हा फक्त शरद पवार यांचा पाठीशी हात त्यामुळे चालायचा, असा टोला किरण माने यांनी पोस्ट करत लगावला होता. याला आता अजित पवार गटातील नेत्याने प्रत्युत्तर दिलं आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी किरण माने यांचा समाचार घेतला आहे.

अमोल मिटकरी काय म्हणाले?

“लाचार वगैरे शब्द वापरताना जरा आपला इतिहास पहावा. उद्धव ठाकरेंच्या दारी लाचारी करून का आणि कसे गेलात ते सगळ्यांना ठाऊक आहे. आपली लढाई लढायला आपल्याला पवार साहेब किंवा उद्धव साहेबांचा सहारा लागतो यातच आपली कुवत कळते. फुकटचे सल्ले आपण स्वतःजवळ ठेवावे.”, असं प्रत्युत्तर अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी दिलं आहे.

किरण माने यांची पोस्ट काय?

माझं आजोळ बारामती. मी गेली दहाबारा वर्ष अजितदादांना जवळनं बघितलंय, सातार्‍याच्या सर्किट हाऊसमध्ये कलेक्टर-कमिशनरपास्नं पत्रकारांपर्यन्त सगळ्यांवर बिनधास्त डाफरताना बघितलंय. कुणाची पर्वा न करता रूबाबात फिरताना बघितलंय. गुरगुरताना बघितलंय. अशा रांगड्या माणसाला अमित शहापुढं लाचार, हतबल बनून उभं राहिलेलं पाहून सुरूवातीला लै वाईट वाटलं, असं किरण मानेंनी म्हटलं.

हळूहळू कळलं की दादांचा तो रूबाब होता कारण पाठीशी साहेब होते. आता स्वबळावर झगडायचंय. अभिषेक बच्चनला वडिलांचा वरदहस्त काढून घेऊन एकदम यवतमाळला पाठवून एकांकिकांपास्नं स्ट्रगल करायला लावला तर कसं होईल? त्याला मनोज तिवारीसुद्धा हाडतुड करेल… तसं दादांचं झालंय हे कळलं. दादांविषयी आदर कमी नाही झाला पण त्यापेक्षा कीव जास्त वाटायला लागली, असं किरण माने म्हणालेत.

जसं बारामती आजोळ, तशी माझी मायभूमी सातारा. पक्ष-फिक्ष बाजूला ठेवून आमचं सातारच्या गादीवर प्रेम. आज असं ऐकलं की आम्हा सातारकरांचे आदरस्थान श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तीन दिवस दिल्लीत आहेत…कारण त्यांना अमित शहाची अपाॅईंटमेन्ट मिळत नाही ! आजची भेटही रद्द झाली. उद्याची वेळ मिळालीय. हा फक्त महाराजांचा अपमान नाही, हा स्वराज्याच्या राजधानीचा अपमान आहे. एवढीच इच्छा आहे की महाराजांनी इतरांसारखे या हुकूमशहांचे ‘पपेट’ होऊ नये. वेळीच योग्य तो निर्णय घ्यावा, असंही त्यांनी म्हटलंय.

मराठी माणसाचा अभिमान असणार्‍या नेत्यांना स्वाभिमान गहाण ठेवून परप्रांतीयांच्या वळचणीला जायची वेळ येणं हे मराठी मुलखासाठी घातक आहे. हे असेच चालू राहिले तर आपल्याला लवकरच ‘जय गुजरात’ अशी घोषणा देण्याची सक्ती आल्याशिवाय रहाणार नाही. ही अतिशयोक्ती नाही. आत्ताच मुंबईत हायकोर्टापासून अनेक ठिकाणी गुजराती बोर्ड दिमाखात झळकू लागलेले आहेत. वेळीच जागे व्हा, अशी पोस्ट किरण माने यांनी केली होती. त्यालाच अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

News Title- Amol Mitkari on Kiran Mane

महत्त्वाच्या बातम्या –

शिंदे गटाला खिंडार?, ‘हा’ बडा नेता अजित पवार गटात जाण्याची शक्यता

रहाणे आणि रचीनचा अफलातून झेल, विराट बघतच राहिला; व्हिडीओ व्हायरल

प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगे यांना मोठा सल्ला; म्हणाले…

भाजपला मोठा धक्का; ‘हा’ मित्र पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार

विराट कोहलीचं पहिल्याच सामन्यात लज्जास्पद कृत्य, व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल