प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगे यांना मोठा सल्ला; म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Prakash Ambedkar | आगामी लोकसभा निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भाजपसह काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर काही उमेदवार निश्चित होणं अद्याप बाकी आहे. महायुतीमध्ये उमेदवारी संदर्भात अजूनही बैठका सुरू आहेत.

दुसरीकडे महाविकास आघाडीही निवडणुकी संदर्भात बैठका घेत आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मोठा सल्ला दिला आहे. त्यामुळे राजकारणात याची चर्चा होत आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी वंचितची जागावाटपासंबंधी भूमिका, महाविकास आघाडीचे निवडणुकीतील भविष्य तसंच विरोधी पक्षाचा प्लान अशा अनेक मुद्यांवर चर्चा केली. मात्र, त्यांनी उमेदवारी आणि जागेबाबत कोणतंच स्पष्ट विधान केलं नाही.

प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

जरांगे पाटील यांना मी स्वतः भेटून त्यांनी निवडणूक लढवावी, असं सांगितलं आहे. मात्र, ते निवडणूक लढण्यासाठी तयार नाहीत. मी अजूनही सांगतो, माझा आणि माझ्या पक्षाचा त्यांना संपूर्ण पाठिंबा असेल. जालन्यातून त्यांनी जर लोकसभा निवडणूक लढवली तर एकही रुपया खर्च न करता ते विरोधी उमेदवाराला 70 टक्के मतांनी पराभूत करू शकतात, असं प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले आहेत.

जरांगे पाटील यांनी अगोदरच निवडणूक लढणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. त्यांना निवडणुकीत वंचित पाठिंबा देईल, असं स्वतः प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. त्यामुळे याबाबत जरांगे आपलं मत बदलून निवडणूकीसाठी उभं ठाकणार, की आपल्या निर्णयावर कायम राहणार यावर सर्वांच्या नजरा असतील.

प्रकाश आंबेडकरांची निवडणूक आयोगाकडे मागणी

दरम्यान, प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी निवडणूक आयोगाकडे गॅस सिलेंडर हे चिन्हं मागितलं आहे. यासोबतच शिट्टी आणि रोड रोलर ही पर्यायी चिन्हेही वंचितने दिली आहेत. आता या तीन चिन्हापैकी निवडणुक आयोग त्यांना कोणते चिन्हं देणार याकडे राज्याचं लक्ष आहे.

News Title : Manoj Jarange should contest LokSabha elections said Prakash Ambedkar

महत्त्वाच्या बातम्या-

विराट कोहलीचं पहिल्याच सामन्यात लज्जास्पद कृत्य, व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल

वाघ अजून म्हातारा झालेला नाही!, पहिल्याच सामन्यात धोनीनं केलेली कमाल व्हायरल

आरसीबीच्या नशिबी पुन्हा पराभव; विराटने मात्र 21 धावा करून रचला इतिहास

IPL 2024: कोहलीच्या संघाचं पुन्हा एकदा जुनंच रडगाणं, पहिल्या सामन्याचा आला निकाल

जीवनात ‘या’ गोष्टी केल्या तर यश तुमच्या पायाशी लोळेल