वाघ अजून म्हातारा झालेला नाही!, पहिल्याच सामन्यात धोनीनं केलेली कमाल व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

CSK v RCB | आयपीएल 2024 हंगामातील पहिलाच सामना प्रेक्षकांसाठी खूप रोमांचक ठरला. चेपॉक स्टेडियमवर काल पिवळं वादळ दिसून आलं. संपूर्ण स्टेडियममध्ये चेन्नईच्या फॅन्सची एकच गर्दी दिसून आली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (CSK) असा पहिला सामना काल (22 मार्च) झाला. पहिल्याच सामन्यात चेन्नईने विजयी सुरुवात केली.

यावेळी महेंद्रसिंह धोनीने पुन्हा एकदा चाहत्यांचं मन जिंकलं. वयाच्या 42 वर्षीही त्याने चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. महेंद्रसिंग धोनीने आपल्या एका रॉकेट थ्रोने चाहत्यांना आश्चर्यचकित केलं. धोनीचा हा पराक्रम पाहून चेपॉकच्या स्टेडियममध्ये बसलेल्या सर्व प्रेक्षकांनीही उत्साहाने उड्या मारल्या.

धोनीनं केलेली कमाल व्हायरल

धोनीच्या एका व्हिडिओने सोशल मिडियावर खळबळ उडवून दिली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा (CSK v RCB ) अनुभवी यष्टीरक्षक धोनीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज अनुज रावतला त्याच्या रॉकेटसारख्या थ्रोने धावबाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. वयाच्या 42 व्या वर्षीही महेंद्रसिंग धोनीमध्ये इतकी अप्रतिम उर्जा पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. त्याचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

धावा घेण्याच्या नादात अनुज रावत विकेट गमावून बसला. धोनीने त्याला स्टंप आऊट करत पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. अनुज रावत 25 चेंडूत 48 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 3 षटकार लगावले. रावतने दिनेश कार्तिकसोबत मिळून सहाव्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी केली आणि संघाला 174 पर्यंतची धावसंख्या गाठून दिली.

चेन्नईने हंगामातील पहिला विजय नोंदवला

रावतने 48 तर कार्तिकने 38 धावा केल्या. बंगळुरूने (CSK v RCB ) चेन्नईला 174 धावांचं आव्हान दिलं. 174 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या सीएसके संघालाही चांगली सुरुवात मिळाली.आयपीएल पदार्पण करणाऱ्या रचिन रवींद्रने 15 चेंडूत 37 धावा केल्या, तर कर्णधार रुतुराज गायकवाडने 15 धावा केल्या. यानंतर अजिंक्य रहाणेने 27 धावांची आणि डॅरिल मिशेलने 22 धावांची छोटी पण प्रभावी खेळी खेळली.

पुढे संघाची कमान दुबे आणि जडेजा या जोडीने सांभाळली. त्यांनी पाचव्या विकेटसाठी 66 धावांची नाबाद भागीदारी करून सीएसकेला विजय मिळवून दिला. जडेजाने 25 धावा तर दुबे 34 धावा करून नाबाद माघारी परतले. चेन्नईने हंगामातील पहिला विजय नोंदवला.

News Title :  CSK v RCB MSingh Dhoni video goes viral

महत्त्वाच्या बातम्या-

आरसीबीच्या नशिबी पुन्हा पराभव; विराटने मात्र 21 धावा करून रचला इतिहास

IPL 2024: कोहलीच्या संघाचं पुन्हा एकदा जुनंच रडगाणं, पहिल्या सामन्याचा आला निकाल

जीवनात ‘या’ गोष्टी केल्या तर यश तुमच्या पायाशी लोळेल

लवासा प्रकरणी मोठी अपडेट समोर!; ईडीची मोठी कारवाई

भाजपच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला मिळालं तिकीट