आरसीबीच्या नशिबी पुन्हा पराभव; विराटने मात्र 21 धावा करून रचला इतिहास

IPL 2024 | आयपीएल 2024 स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगला. बंगळुरुने 20 षटकात 6 गडी गमवून 173 धावा केल्या आणि विजयासाठी 174 धावांचं आव्हान दिलं होतं. हा सामना सीएसकेने जिंकला आहे. पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला गमावावा लागला.

आरसीबीच्या नशिबी पुन्हा पराभव

चेन्नईला राचीन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरेल मिशेल यांनी चांगली सुरुवात करुन दिली. मात्र, नियमित अंतरानं विकेट पडत गेल्यानं मॅचमध्ये चुरस निर्माण झाली होती. चेन्नईनं 19 व्या ओव्हरमध्येच विजय मिळवत आरसीबीला पराभूत केलं. चेन्नईनं यंदाच्या आयपीएलची सुरुवात सांघिक कामगिरीच्या जोरावर विजयानं केली आहे.

आरसीबीनं दिलेल्या 174 धावांचा आव्हान पाठलाग करणाऱ्या चेन्नईच्या टीमनं आक्रमक सुरुवात केली. मात्र, कर्णधार ऋतुराज गायकवाड आज मोठी धावसंख्या करु शकला नाही. तो 15 धावा करुन बाद झाला.

विराटने रचला इतिहास

विराट कोहलीचा डाव 21 धावांवर आटोपला असला तरी एक मोठा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. विराट कोहलीने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 15 धावा करताच हा विक्रम आपल्या नावे केला आहे.

विराट कोहलीने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 1000 हून अधिक धावा केल्या आहेत. यापूर्वी शिखर धवनने अशी कामगिरी केली होती. चेन्नईविरुद्ध 1000 धावा केल्या आहेत. शिखर धवनने आतापर्यंत 1057 धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीने 1006 धावा केल्या आहेत.

विराट कोहलीने टी20 क्रिकेटमध्येही नवा इतिहास रचला आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 6 धावा करताच आंतरराष्ट्रीय-देशांतर्गत टी20-फ्रेंचायसी लीगमध्ये मिळून 12000 धावा पूर्ण केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

IPL 2024: कोहलीच्या संघाचं पुन्हा एकदा जुनंच रडगाणं, पहिल्या सामन्याचा आला निकाल

जीवनात ‘या’ गोष्टी केल्या तर यश तुमच्या पायाशी लोळेल

लवासा प्रकरणी मोठी अपडेट समोर!; ईडीची मोठी कारवाई

भाजपच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला मिळालं तिकीट

“मफलरवाला आत गेला आता लवकरच…”, नितेश राणेंच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ