“मफलरवाला आत गेला आता लवकरच…”, नितेश राणेंच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nitesh Rane Tweet | आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. राज्याच्या नाहीतर देशाच्या राजकारणामध्ये मोठा ट्वीस्ट निर्माण झाला आहे. राज्यामध्ये ईडीच्या भितीने विरोधक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. अशातच आता दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना रात्री अटक करण्यात आली होती. यावरून आता भाजप नेते नितेश राणे यांनी ट्वीट (Nitesh Rane Tweet) करत टीका केली आहे.

मद्य घोटाळ्यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली. त्यानंतर आता देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. ईडीने तब्बल 9 वेळा केजरीवाल यांना समन्स बजावलं. त्यानंतर त्यांची काल सायंकाळी चौकशी सुरू होती. त्यानंतर त्यांना थेट अटक करण्यात आल्याने राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली. यावर आता भाजप नेते नितेश राणे यांनी मिश्किल ट्वीट (Nitesh Rane Tweet) केलं आहे. त्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

काय आहे ट्वीट?

नितेश राणे हे नेहमीच आपल्या वक्तव्यासाठी चर्चेत असतात. अरविंद केजरीवाल यांच्या ट्वीटनंतर त्यांनी एक ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटची सर्वत्र चर्चा होत आहे. “मफलरवाला आत गेला आता लवकरच गळ्याला पट्टा लावणारा आत जाणार आहे” असं ट्वीट करत नितेश राणे (Nitesh Rane Tweet) यांनी इशारा दिला आहे. त्यानंतर “क्रोनोलॉजी समझो”, असं नितेश राणे यांनी ट्वीट केलं आहे.

नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर रोष?

ट्वीट करत असताना नितेश राणे (Nitesh Rane Tweet) यांनी प्रतिकात्मक टीप्पणी केली आहे. केजरीवाल हे मफलर घालायचे म्हणून त्यांना मफलरवाला असा उल्लेख केला. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सर्जरी झाली होती. त्यांच्या गळ्याला पट्टा लावण्यात आला होता, त्यामुळे नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंवर रोष आहे का?, असा सवाल उपस्थित होत आहे.

दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी अटक

दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांना अटक करण्यात आली. ही त्यांची 16 वी अटक आहे. काल रात्री ईडीची टीम सायंकाळी 7 वाजता अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचली. त्यानंतर दोन तासांची तपासणी केल्यानंतर केजरीवाल यांना अटक करण्यात आली.

दिल्ली सरकारने 2021-22 साली दारू विक्रीबाबत नवीन धोरण बनवलं. सरकारी महामंडळाऐवजी दारू विक्रीचे अधिकार खासगी वितरकांना देण्यात आलं. दिल्लीतल्या एकूण 16 विक्रेत्यांना दारू वितरणाची जबाबदारी दिली. यामुळे नव्या धोरणाने दारूचा काळाबाजार थांबला.

News Title – Nitesh Rane Tweet Against Arvind Kejriwal

महत्त्वाच्या बातम्या

होळीच्या दिवशी ‘लुसलुशीत पुरणपोळी’ बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा!

SBI च्या करोडो ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी!

‘एक दिवस शमी माझ्यामागून…’; अभिनेत्री वंदना गुप्तेंनी सांगितला भन्नाट किस्सा

Xiaomi Civi 4 Pro या दिवशी बाजारात करणार एंट्री; मिळणार जबरदस्त फीचर्स

केजरीवालांच्या अटकेवर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया; म्हणाले ‘अरविंदच्या डोक्यात…’