Anna Hazare | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना काल (21 मार्च) ईडीकडून अटक करण्यात आली आहे. चौकशीत योग्य ती उत्तरे न दिल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.केजरीवाल यांच्या अटकेनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यांच्या अटकेवर आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
केजरीवाल यांना अण्णा हजारे यांच्यामुळे ओळख मिळाली होती. मात्र, नंतर केजरीवाल यांनी राजकारणाची वाट धरल्याने दोघांचे मार्ग वेगळे झाले. अण्णांना केजरीवालांचा हा निर्णय पटला नाही. त्यांनी केजरीवालांवर बऱ्याचदा टीका सुद्धा केली आहे. आता अण्णा हजारे बऱ्याच वर्षांनी प्रकाशझोतात आले आहेत.
नेमकं काय म्हणाले हजारे?
मी खुपवेळा केजरीवालांना दारु धोरण बंद करावं यासाठी पत्र लिहिली दारु धोरणावर पत्र लिहिण्यामागे माझा उद्देश अन्याय संपवण्याचा होता. दारुमुळे अनेकांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. यामुळे हत्येची प्रकरण वाढतात. महिलांवर अत्याचार वाढतो. म्हणून मी दारु धोरण बंद करण्याची मागणी केले होती, असं अण्णा म्हणालेत.
अरविंदच्या डोक्यात मी जे सांगतोय ते कधी आलच नाही. त्याने दारु धोरण सुरु केलं. अखेर आज त्या दारुमुळेच त्याला अटक झालीये. पण काहीच करू शकत नाही, सत्तेपुढे कोणाचं काही चालत नाही. आता जे होईल ते सरकारच्या धोरणानुसार होईल. सरकार त्यांच्याबाबत विचार करेल, असं अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी म्हटलं आहे.
अरविंद केजरीवाल यांना अटक
दरम्यान, या पार्श्वभूमीवरच अण्णा हजारे यांच्यासह (Anna Hazare) शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “निवडणुका जवळ आल्याने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. त्याचा जाहीर तीव्र निषेध. भाजप सत्तेसाठी अजून किती झुकणार हे या अटकेवरून दिसून आलं आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधामध्ये इंडिया अघाडी एकजुटीने उभी आहे”, असं शरद पवार म्हणाले आहेत.
अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. केजरीवाल यांच्या अटकेनंतर आपच्या कार्यकर्त्यांकडून निषेध केला जात आहे. दिल्लीत याचे तीव्र पडसाद दिसून आले. या प्रकरणी आंदोलन केल्यामुळे दिल्ली पोलिसांनी मंत्री सौरभ भारद्वाज यांना अटक केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या खटल्याची सुनावणी न्यायमूर्ती खन्ना यांच्या खंडपीठात होणार आहे.
News Title : Anna Hazare first reaction to Arvind Kejriwal arrest
महत्त्वाच्या बातम्या-
आजपासून सुरु होणार IPL 2024 चा रणसंग्राम! आज होणार CSK Vs RCB लढत
IPL 2024 ची 5 वैशिष्ट्ये! विविध कारणांनी यंदाचं पर्व गाजणार, वाचा सविस्तर
होळी रे होळी पुरणाची पोळी! जाणून घ्या शुभ मुहूर्त
रामराजे निंबाळकरांचा गर्भित इशारा, भाजपचं टेंशन वाढलं
अभिनेता रणदीप हुड्डाचा अनेक वर्षांनंतर ऐश्वर्या रायबद्दल मोठा खुलासा!