IPL 2024 ची 5 वैशिष्ट्ये! विविध कारणांनी यंदाचं पर्व गाजणार, वाचा सविस्तर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 | जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीगच्या सतराव्या हंगामाला आजपासून सुरुवात होत आहे. आयपीएल 2024 शुक्रवारपासून सुरू होत आहे. (IPL 2024) चेन्नई सुपर किंग्ज या हंगामात नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार आहे. ऋतुराज गायकवाड संघाची धुरा सांभाळणार आहे. (IPL 2024 Schedule) खुद्द महेंद्रसिंग धोनीने ऋतुराजवर ही जबाबदारी सोपवली आहे. (CSK vs RCB Match) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील लढतीने आयपीएलला सुरुवात होत आहे. (IPL 2024 CSK vs RCB)

आयपीएलचा यंदाचा हंगाम विविध कारणांमुळे खास असणार आहे. याची अनेक कारणे आहेत. CSK सोबतच इतर संघांनी कर्णधार बदलले आहेत. रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्समध्ये परतला आहे. आयपीएलसाठी नवे मैदानही तयार करण्यात आले आहे. यष्टीरक्षक रिषभ पंत प्रदीर्घ कालावधीनंतर मैदानात परतत आहे. 2022 मध्ये त्याने आयपीएलमध्ये शेवटचा सामना खेळला होता. यानंतर कार अपघातामुळे तो क्रिकेटपासून दूर राहिला. पंतने आयपीएलमध्ये 98 सामने खेळले आहेत.

आजपासून थरार

खरं तर यावेळचा आयपीएल हंगाम सर्वात मोठा असेल. देशात लोकसभा निवडणुकीमुळे संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाही. हंगामातील केवळ पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यावेळी 22 मार्चपासून हंगाम सुरू होत असून त्याचा अंतिम सामना 26 मे रोजी होणार असल्याचे कळते.

CSK चा कर्णधार बदलला आहे. आता ऋतुराज गायकवाड संघाची धुरा सांभाळणार आहे. यावेळी सर्वांच्या नजरा ऋतुराजवर असतील. गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्समध्येही मोठा बदल झाला आहे. मुंबईने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवले आहे. त्याच्या जागी हार्दिककडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गुजरातचे नेतृत्व शुबमन गिल करणार आहे. तर पॅट कमिन्सकडे सनरायझर्स हैदराबादची जबाबदारी आहे.

IPL 2024 ची 5 वैशिष्ट्ये

23 मार्च रोजी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना चंदीगड मुल्लानपूर स्टेडियमवर होणार आहे. त्याला महाराजा यादविंद्र सिंग क्रिकेट स्टेडियम असे नाव देण्यात आले आहे. पंजाब क्रिकेट असोसिएशनचे हे स्टेडियम आहे, जे नुकतेच पूर्ण झाले आहे. हे स्टेडियम 38.20 एकरवर बांधले गेले आहे. या मैदानात जवळपास 36000 लोक एकाच वेळी सामना पाहू शकतात.

तसेच यंदाच्या हंगामातून आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू मैदानात दिसणार आहे. मिचेल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटींना विकत घेतले आहे. स्टार्कची एकूण कामगिरी दमदार राहिली आहे. स्टार्कनंतर पॅट कमिन्स हा सर्वात महागडा खेळाडू आहे. हैदराबादने त्याला 20.50 कोटी रुपयांना खरेदी केले.

News Title- IPL 2024 starts with CSK vs RCB match Read here major 5 features
महत्त्वाच्या बातम्या –

होळी रे होळी पुरणाची पोळी! जाणून घ्या शुभ मुहूर्त

रामराजे निंबाळकरांचा गर्भित इशारा, भाजपचं टेंशन वाढलं

अभिनेता रणदीप हुड्डाचा अनेक वर्षांनंतर ऐश्वर्या रायबद्दल मोठा खुलासा!

कोहलीला ‘विराट’ विक्रमासाठी फक्त 6 धावांची गरज; असं करणारा ठरणार पहिला भारतीय

आजपासून रंगणार आयपीएलचा थरार, ‘या’ दोन संघांमध्ये पहिली लढत