आजपासून रंगणार आयपीएलचा थरार, ‘या’ दोन संघांमध्ये पहिली लढत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 | इंडियन प्रीमियर लीगची (IPL 2024) सुरुवात आजपासून (22 मार्च) होणार आहे. आयपीएलचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. चाहते वर्षभर या सामन्यांची वाट पाहत असतात. यंदाचा सीझन तसा खास ठरणार आहे. कारण जवळपास बऱ्याच टीमचे कॅप्टन्स बदलण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये संघांचं नेतृत्व हे युवा खेळाडूंच्या हातात असणार आहे.

या सीझनमधील पहिला सामना आज चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. चेन्नईमधील एम.ए. चिदंबरम स्टेडियममध्ये रात्री 8 वाजता हा सामना रंगणार आहे. महेंद्रसिंह धोनीने कालच चेन्नईच्या कर्णधार पदावरून माघार घेत युवा खेळाडू ऋतुराज गायकवाडकडे संघाची धुरा दिली आहे.

त्यामुळे यावेळी ऋतुराज गायकवाड सोबत चेन्नई मैदानात उतरेल. पाच वेळचा चॅम्पियन आणि गतविजेता चेन्नईचा संघ विक्रमी सहाव्या विजेतेपदासाठी प्रयत्नशील असणार आहे. तर,दुसरीकडे आरसीबी प्रथमच विजेतेपदावर कब्जा करण्यासाठी मैदानात उतरेल. आयपीएलमध्ये सीएसके आणि आरसीबीचे संघ आतापर्यंत 31 वेळा आमनेसामने आले आहेत. यात चेन्नईने 20 सामने जिंकले, तर बंगळुरूने 10 जिंकले. एक सामना अनिर्णित राहिला आहे.

सलामीला चेन्नई-बंगळूरु आमनेसामने

बंगळूरुच्या महिला संघाने नुकत्याच झालेल्या महिला प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) दुसऱ्या हंगामाचे जेतेपद पटकावले आहे. आता त्यांच्याकडून प्रेरणा घेत आपला गेल्या 16 वर्षांपासूनचा ‘आयपीएल’ जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या दृष्टीने बंगळूरुचा संघ अधिक प्रयत्नशील असणार आहे. त्यामुळे आजचा सामना अधिक रोमांचक असणार आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईचा महेंद्रसिंह धोनीची निवृत्ती, विराट कोहलीची जेतेपदाची प्रतिक्षा, जीवघेण्या अपघातातून बचावलेल्या ऋषभ पंतचे पुनरागमन आणि नेतृत्वाच्या जबाबदारीविना खेळणारा रोहित शर्मा याबाबत अधिक चर्चा आहेत. त्यामुळे या खेळाडूंच्या प्रदर्शनाकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.

‘इथे’ बघता येणार लाईव्ह सामने

चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यातील पहिलाच सामना बघण्यासाठी चाहते आतुर आहेत.हा सामना प्रेक्षकांना स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी, जिओ सिनेमा अ‍ॅपवर लाईव्ह बघता येणार आहे. आज रात्री 8 वाजेपासून सामन्याला सुरुवात होईल.

News Title- IPL 2024 Tournament Begins Chennai Vs Bangalore

महत्त्वाच्या बातम्या –

संजय राऊतांची मोदींवर टीका, एकनाथ शिंदे भडकले, राऊतांना झापलं…

अरविंद केजरीवालांच्या संपत्तीचा आकडा आला समोर!

सर्वात मोठी बातमी! ईडीकडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना अटक

अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी!

‘पुष्पा 2’ मधील रश्मिकाचा लूक समोर; चाहत्यांची उत्सुकता शिगेला