‘पुष्पा 2’ मधील रश्मिकाचा लूक समोर; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pushpa 2 | साऊथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना त्यांच्या आगामी ‘पुष्पा 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. याच्या पहिल्या पार्टने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. पहिल्या पार्टमधील अल्लू अर्जुनला त्याच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारदेखील मिळाला आहे.

आता या चित्रपटातील श्रीवल्ली म्हणजेच रश्मिकाचा लुक समोर आला आहे. रश्मिका मंदानाचा लूक सोशल मीडियावर लीक झाला आहे. या फोटोमध्ये रश्मिका वधूच्या वेशभूषेत दिसून येत आहे. ‘पुष्पा 2’च्या सेटवरील हा फोटो आहे. यात रश्मिकाने लाल रंगाची साडी नेसली असून तिच्या भांगेत सिंदूरसुद्धा दिसून येत आहे. तिचा हा लूक पाहून ती पुष्पराजसोबत लग्नाचा सीक्वेन्स शूट करत असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे.

रश्मिकाच्या या व्हायरल होणाऱ्या लूकवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा : द राईज’ हा चित्रपट डिसेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रचंड हीट ठरला होता. आता प्रेक्षकांना याच्या सेकंड पार्टची आतुरता आहे.

रश्मिकाचा लूक समोर

याच्या पहिल्या पार्टमध्ये अल्लू अर्जुनसोबतच रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल मुख्य भूमिकेत दिसले होते. अल्लू अर्जुनला ‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटातील भूमिकेसाठी ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ देखील मिळाला आहे. हा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा तो पहिला तेलुगू अभिनेता ठरला.

यापूर्वी अल्लू अर्जुनचाही एक फोटो लीक झाला होता. तर, चित्रपटाच्या फर्स्ट-लूक पोस्टरमध्ये अल्लू अर्जुन एका महिलेच्या वेशात दिसला होता. तेव्हा अभिनेता ‘गंगम्मा तल्ली जथारा’ मध्ये सामील होणार असल्याचं म्हटलं गेलंय. तिरुपतीमध्ये ‘गंगाम्मा तल्ली जथारा’ ही एक प्रचलित प्रथा आहे. दरवर्षी आठवडाभर हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी पुरुष स्त्रियांच्या वेशभूषा करतात आणि गंगम्माच्या रूपात दिसतात.

कानात झुमके, गळ्यात सोन्याची दागिने तसेच लिंबूचा हार, लाल टिकली आणि काजळ असा अवतार घेत अल्लू अर्जुनचा पहिला लुक पोस्ट करण्यात आला होता. त्यामुळे चाहते या चित्रपटासाठी उत्सुक आहेत. आता रश्मिकाचाही हा फोटो व्हायरल होत आहे.

‘या’ तारखेला रिलीज होणार पुष्पा 2

बहुचर्चित असा हा ‘पुष्पा 2’ (Pushpa 2 ) चित्रपट 15 ऑगस्ट 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तामीळ, तेलुगू, हिंदी आणि इतर भाषेतही हा चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटासाठी 500 कोटींचे बजेट असल्याचे म्हटलं जात आहे. याच्या पहिल्या पार्टने बरीच कमाई केली होती. आता चाहते याच्या दुसऱ्या पार्टची आतुरतेने वाट बघत आहेत.

News Title- Pushpa 2 Rashmika Mandanna Look Leaked 

महत्त्वाच्या बातम्या –

“महाराष्ट्रात अचानक औरंग्याच्या औलादी वाढल्या”, राऊतांचं ते विधान अन् भाजपचा संताप!

रोहितला मिठी मारायची नव्हती पण…; अखेर हार्दिक आणि हिटमॅनची गळाभेट, पाहा Video

“मध्यमवर्गीयांच्या फक्त 3 गरजा असतात त्या म्हणजे…”, पंतप्रधानांनी सांगितली मोदी गॅरंटी!

पैशासाठी विद्यार्थिनीने रचला अपहरणाचा कट; वडिलांकडे मागितले 30 लाख, केंद्रीय मंत्र्यानेही घेतली दखल

रूपाली चाकणकरांच्या बुद्धीचीच किव येते, कारण त्यांनी…”, जितेंद्र आव्हाड संतापले