“मध्यमवर्गीयांच्या फक्त 3 गरजा असतात त्या म्हणजे…”, पंतप्रधानांनी सांगितली मोदी गॅरंटी!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Narendra Modi | लोकसभा निवडणुकीचे सर्वत्र वारे वाहत आहे. सत्ताधारी पक्ष आपल्या कामांची पोचपावती जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नात आहे, तर विरोधक विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील प्रचाराचा नारळ फोडला असल्याचे दिसते. सध्या देशातील प्रत्येक गरीबाचा मोदी गॅरंटीवर विश्वास असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले. ‘रायझिंग इंडिया समिट’ या कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदींनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आता सुरू आहे ते काहीच नाही आपल्याला आणखी खूप पुढे जायचे आहे. नाना अडचणींचा सामना करून आता मध्यमवर्ग पुढे आला आहे. मध्यमवर्गीयांना कराच्या समस्येचा सामना करावा लागत होता. प्रत्येक छोट्या कामासाठी ते सरकारी कार्यालयात जात असत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात समस्या होत्या. त्यांच्या फक्त तीन गरजा होत्या. प्रथम घर बांधणे, दुसरे मुलांची लग्ने लावणे आणि तिसरी म्हणजे त्यांनी नोकरी मिळवून देणे.

मोदींनी वाचला योजनांचा पाढा

मोदी पुढे म्हणाले की, बँक खाते उघडण्यासाठी ज्या लोकांकडून गॅरंटी मागितली होती, त्या सर्वांची गॅरंटी मी घेतली. त्यामुळेच मुद्रा योजना अस्तित्वात आली. आमच्याकडे गरीब तरुणांसाठी 30 लाख कोटी रुपये आहेत. आज मोदींच्या गॅरंटीचा सकारात्मक परिणाम झाला आहे… यासाठी कोणत्याही जाहिरातीची गरज नाही, ही गॅरंटी मी गरिबांकडून घेतली होती.

तसेच मागील सरकारने मध्यमवर्गाकडे दुर्लक्ष केले होते. गेल्या 10 वर्षात आम्ही खूप बदल केले आहेत… आज 7 लाख रुपयांचे उत्पन्न घेणारा व्यक्ती करमुक्त आहे… पूर्वी 2 लाख उत्पन्न घेणारा व्यक्ती कर पात्र होता… आम्ही गृहकर्जाचे व्याजदर कमी केले आहे… याशिवाय गेल्या 10 वर्षांत दररोज दोन नवीन महाविद्यालये बांधली गेली आणि दर आठवड्याला एक विद्यापीठ बांधले गेले, अशा शब्दांत मोदींनी आपल्या योजनांचा पाढा वाचला.

Narendra Modi यांची गॅरंटी

सर्वसामान्यांच्या वेदना सांगताना मोदी म्हणाले की, देशातील गरिबांना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अडचणी सहन कराव्या लागतात, मी ते जीवन जगले आहे. आमची प्रत्येक योजना गरीबांच्या गरजा लक्षात घेऊन काम करते. ज्याला कोणीच विचारले नाही, त्याने आमच्यावर विश्वास दाखवला आहे, असे मोदींनी आणखी सांगितले.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सभांच्या माध्यमातून देखील आपले काम जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात सात टप्प्यात लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे, तर राज्यात पाच टप्प्यात निवडणूक होईल. 4 जून रोजी देशभरातील लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल.

News Title- Prime Minister Narendra Modi has mentioned three major needs of the middle class while stating his guarantee
महत्त्वाच्या बातम्या –

बीडमध्ये मोठा राजकीय भूकंप, अजित पवार-पंकजा मुंडे अडचणीत सापडणार?

मोठी बातमी! अभिनेेत्री राखी सावंतच्या अडचणीत वाढ

अंकिता लोखंडे दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; फोटो तुफान व्हायरल

‘पवारांचा बदला घ्यायची हीच वेळ’; विजय शिवतारेंनी घेतली ‘या’ नेत्याची भेट

मनोज जरांगे पाटलांना दिलासा देणारी बातमी समोर!