मोठी बातमी! अभिनेेत्री राखी सावंतच्या अडचणीत वाढ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rakhi Sawant | बाॅलिवूड अभिनेत्री राखी सावंत गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. एवढंच नाही तर सोशल मीडियावर देखील राखीचे भरपूर व्हिडीओ व्हायरल होत असतात. इंस्टाग्राम अकाउंटवर सुद्धा राखीची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. चाहत्यांसाठी ती वेगवेगळे पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करत असते. राखीचे चाहते देखील तिच्या पोस्टला लाईक करत कमेंट्स करत असतात. मात्र सध्या राखी एका कचाट्यात अडकल्याचं म्हटलं जात आहे. माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी राखीवर काही आरोप केले आहेत. त्यामुळे राखीच्या अढचणीत वाढ झाल्याचं चित्र पहायला मिळालं.

नेमकं काय घडलं?

माजी अधिकारी समीर वानखेडे यांना अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानला ड्रग प्रकरणात अटक झाली होती. मात्र, आता समीर वानखेडे यांनी राखी आणि तिचा वकील अली काशिफ यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. समीर वानखेडे यांनी मुंबईतील दिंडोशी शहर दिवाणी न्यायालयात हा खटला दाखल केला आहे. आपली प्रतिमा डागाळण्याचा आणि बदनामीचा प्रयत्न केला, असा आरोप समीर वानखेडे यांनी केला आहे.

एवढंच नाही तर वानखेडे यांनी, समीर वानखेडे यांनी राखी सावंत (Rakhi Sawant) आणि तिच्या वकिलाविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. राखी आणि तिचे वकील अली काशिफ खान यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करत समीर वानखेडे यांनी 11 लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे.

अली काशिफ काय म्हणाले?

समीर वानखेडे यांनी केलेल्या आरोपांवर राखीचे (Rakhi Sawant) वकील यांनी यावर प्रतिक्रिया दिली. अली काशिफ म्हणाले की, ‘जनतेच्या भल्यासाठी सत्य बोलल्यास बदनामी होत नाही, कायद्याचा अर्थ असा आहे होतो की, आयपीसीच्या कलम 499 मधील दुसरा अपवाद म्हणजे ‘पब्लिक कंडक्ट ऑफ पब्लिक सर्व्हंट्स’. 

यचा अर्थ असा की, “एखाद्या सार्वजनिक सेवकाच्या सार्वजनिक कार्यात त्याच्या वागणुकीबद्दल किंवा चारित्र्याबद्दल सद्भावनेने मत मांडले गेले तर त्याची बदनामी, मानहानी होत नाही’. पुढे ते म्हणाले की, या प्रकरणी आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ. दरम्यान यासंदर्भात राखी सावंतने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

News Title : rakhi sawant gets in troubled

महत्त्वाच्या बातम्या-

‘पवारांचा बदला घ्यायची हीच वेळ’; विजय शिवतारेंनी घेतली ‘या’ नेत्याची भेट

मनोज जरांगे पाटलांना दिलासा देणारी बातमी समोर!

‘माझं धार्मिक स्थळांना भेट देणं…’; सारा अली खानने नेटकऱ्यांना सुनावलं

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा देश सोडणार?; ‘या’ देशात होणार शिफ्ट?

शहांसोबतच्या भेटीबाबत बाळा नांदगावकरांनी दिली महत्त्वाची माहिती!