बीडमध्ये मोठा राजकीय भूकंप, अजित पवार-पंकजा मुंडे अडचणीत सापडणार?

Beed News | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मोठा धक्का बसला आहे. बीडमधील (Beed NCP) राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते मानले जाणारे बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP-Sharad Pawar) गटात प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्यासाठी हा मोठा सेटबॅक मानला जात आहे.

महायुतीमध्ये अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झाला, त्यामुळे लोकसभा निवडणुकीची सारी गणितं बदलून गेली. भाजपने बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आणि अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना निवडून देण्याचा शब्द दिला. त्यामुळे बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) नाराज असल्याची चर्चा होती, अखेर त्यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला.

काय आहेत बीडमधील समीकरणं?

बीड लोकसभा मतदारसंघात (Beed News) सध्या भाजपच्या प्रीतम मुंडे (Pritam Munde) या खासदार आहेत, भाजपने 2024 लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचा पत्ता कट केला आणि या ठिकाणावरुन पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. यावेळी अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील त्यांच्या सोबत आहे.

दुसरीकडे अजित पवार गटातील बजरंग सोनवणे (Beed Bajrang Sonawane) यांनी मागील लोकसभा निवडणुकीवेळी प्रीतम मुंडे यांना टक्कर दिली होती. यावेळी बीड लोकसभा निवडणुकीचं तिकीट आपल्याला मिळेल, अशी बजरंग सोनवणे यांची अपेक्षा होती. मात्र महायुतीमध्ये बीडची जागा भाजपकडे गेल्याने बजरंग सोनवणे यांच्या स्वप्नांचं पाणी झालं.

महाविकास आघाडीचं तिकीट कुणाला?

दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून बीडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार हा पक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्याच्याकडून बजरंग सोनवणे किंवा विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना तिकीट मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.

ज्योती मेटे (Jyoti Mete Beed) यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आपल्या शासकीय नोकरीचा सुद्धा राजीनामा दिला आहे, त्यामुळे आता या जागेवर शरद पवार नेमकी कुणाला संधी देतात?, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

News Title: Beed News Bajrang Sonawane

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! अभिनेेत्री राखी सावंतच्या अडचणीत वाढ

अंकिता लोखंडे दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; फोटो तुफान व्हायरल

‘पवारांचा बदला घ्यायची हीच वेळ’; विजय शिवतारेंनी घेतली ‘या’ नेत्याची भेट

मनोज जरांगे पाटलांना दिलासा देणारी बातमी समोर!

‘माझं धार्मिक स्थळांना भेट देणं…’; सारा अली खानने नेटकऱ्यांना सुनावलं