Ankita Lokhande | अभिनेत्री अंकिता लोखंडे काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस 17’ मुळे चर्चेत होती. तिचा पती विकी जैन सोबत ती या शोमध्ये सामील झाली होती. या शोमध्ये दोघेही भांडताना दिसून आले. बऱ्याचदा त्यांचं भांडण इतकं टोकाला गेलं की त्यांनी लग्न करून चूक केल्याचंही म्हटलं.
‘बिग बॉस 17’ शोमध्ये अंकिताची सासू रंजना जैन यांनीही हजेरी लावली होती. विकीची आई रंजना जैन यांनी अंकितावर अनेक आरोप लावले होते. त्यामुळे सोशल मिडियावर त्या बऱ्याच ट्रोल झाल्या होत्या. अंकिताची बाजू घेण्यासाठी तेव्हा बरीच मंडळी धावून आली होती.
यामध्ये अभिनेत्री कंगणा रनौतचा देखील समावेश होता. त्यातच अंकिता शोमध्ये सतत तिचा एक्स बॉयफ्रेंड दिवंगत सुशांत सिंह राजपूतचा उल्लेख करत असे. यामुळे विकी आणि तिचे अनेकदा भांडण झाले. अंकीताची समजूत काढण्यासाठी तिच्या आईनेही शोमध्ये हजेरी लावली होती.
अंकीताने दुसऱ्यांदा केलं लग्न
‘बिग बॉस 17’ च्या घरात अंकीता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन त्यांच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आले होते. त्यांची भांडणं बघून ते लवकरच विभक्त होणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र शो संपताच ते एकत्र पार्टी करताना दिसून आले. आता ते दोघेही सुखी सांसारिक आयुष्य जगत आहेत. मात्र, असं असतानाच अंकीताचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो पाहिल्यानंतर चाहते देखील हैराण झाले आहेत. फोटोमध्ये अंकिता पुन्हा विकी याच्यासोबत लग्न करताना दिसत आहे. पण दोघांनी पुन्हा लग्न का केलं? याबद्दल कोणतीही माहिती कळू शकलेली नाही. सध्या सर्वत्र फक्त अंकिता आणि विकी यांनी दुसऱ्यांदा केलेल्या लग्नाची चर्चा रंगली आहे.
अंकीता-विकी जैनचे फोटो तूफान व्हायरल
अंकिता (Ankita Lokhande) आणि विकी यांनी 14 डिसेंबर 2021 मध्ये लग्न केलं. लग्नाआधी अनेक वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं. भारतात लग्न झाल्यानंतर अंकिता आणि विकी यांनी परदेशात देखील लग्न केलं. यानंतर सलमान खानने ‘बिग बॉस’मध्ये त्यांचं पुन्हा लग्न लावलं होतं. तेव्हा सलमानने त्यांना पुन्हा सात वचनांची आठवण करून दिली होती. आता पुन्हा दोघांच्या लग्नाची चर्चा होत आहे. त्यांचे फोटो आता व्हायरल होत आहेत.
News Title- Ankita Lokhande got married again
महत्वाच्या बातम्या-
15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी करायचाय? तर हे जबरदस्त फोन खरेदी करा
‘मिर्झापूर 3’ च्या पोस्टरवरून चाहते भडकले; नेमकं घडलं तरी काय?
अजित पवारांना मोठा झटका; एका ओळीचं पत्र लिहीत ‘या’ नेत्याने दिला राजीनामा
बच्चन कुटुंबात पुन्हा वाद?; सासूमुळे ऐश्वर्याला कोसळलं रडू, पाहा व्हिडीओ