‘पवारांचा बदला घ्यायची हीच वेळ’; विजय शिवतारेंनी घेतली ‘या’ नेत्याची भेट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Baramati lok sabha | आगामी लोकसभा निवडणूक आता जवळ आली असून बारामती लोकसभा (Baramati lok sabha) मतदारसंघाची सर्वत्र चर्चा आहे. बारामती मतदारसंघामध्ये पुरंदर आणि भोरचा सहभाग आहे. यामधील पुरंदर तालुका हा विजय शिवतारे यांच्या बाजूने आहे, असं स्वत: विजय शिवतारे यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेत सांगितलं.

अनंतराव थोपटे आणि विजय शिवतारे यांच्यात भेट झाली आहे. काही दिवसांआधी शरद पवार यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता लगेच विजय शिवतारे यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली आहे. याभेटीमध्ये अनंतराव थोपटे यांनी शिवतारे यांच्या मागे उभे राहावे. मला आपला अशिर्वाद हवा असल्याचं म्हणत शिवतारे यांनी अनंतराव यांना भावनिक साद घातली आहे. (Baramati lok sabha)

आता विजय शिवतारे यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेत राजकीय जुन्या गोष्टी विसरू नका, आता आम्हाला साथ द्या अशी साद शिवतारे यांनी घातली. पवारांनी अनंतराव यांची भेट घेतली होती, तेव्हा सुप्रिया सुळे यांना विजयी करण्यासाठी अनंतराव थोपटे यांनी शब्द दिला. त्यानंतर आता विजय शिवतारे यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली.

भेटीत नेमकं काय घडलं?

अनंतराव थोपटे आणि विजय शिवतारे यांच्यामध्ये भेट झाली. याभेटीमध्ये विजय शिवतारे यांनी अनंतराव थोपटे यांना साद घातली. “पवारांच्या मतदारांविरोधात मी साथ देणार आहे. हा लोकशाहीतील वाद असून विरोधातील लोकांना संधी देणं आवश्यक आहे. शरद पवार यांनी आपल्याला 1999 मध्ये पाडलं होतं. अजित पवार यांनी जाहीर सभेमध्ये आपली लायकी काढली होती. पुरंदरचे लोकं म्हणतात की आम्ही नोटाला मत देऊ पण आम्ही पवारांना मत देणार नाही”, असं विजय शिवतारे म्हणाले आहेत. (Baramati lok sabha)

पुरंदरचं काय? अनंतरावर थोपटे यांचा प्रश्न

पुरंदरची स्थिती कशी आहे? असा प्रश्न अनंतराव थोपटे यांनी विजय शिवतारे यांना केला होता. यावर आता विजय शिवतारे यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, पुरंदर सर्व आपल्या मागे आहे, असं विजय शिवतारे म्हणाले.

विजय शिवतारे, अजित पवार आणि शरद पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघासाठी (Baramati lok sabha) अनंतराव थोपटे यांची भेट घेताना दिसत आहेत. यावर आता अनंतराव थोपटे आणि पुत्र संग्राम थोपटे कोणाला साथ देणार हे पाहणं गरजेचं असणार आहे.

News Title – Baramati lok sabha Vijay Shivtare meet Anantrao Thopate

महत्त्वाच्या बातम्या

‘मिर्झापूर 3’ च्या पोस्टरवरून चाहते भडकले; नेमकं घडलं तरी काय?

अजित पवारांना मोठा झटका; एका ओळीचं पत्र लिहीत ‘या’ नेत्याने दिला राजीनामा

बच्चन कुटुंबात पुन्हा वाद?; सासूमुळे ऐश्वर्याला कोसळलं रडू, पाहा व्हिडीओ

राज ठाकरे अमित शहांच्या भेटीत काय ठरलं?, मोठी माहिती समोर

रस्त्यावर नमाज पठण करण्याबाबत जावेद अख्तर यांचं मोठं वक्तव्य!