मनोज जरांगे पाटलांना दिलासा देणारी बातमी समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा गावागावात जाऊन जाहीर सभा घेत आहे. जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नाही मिळत तोपर्यंत आंदोलन आणि सभा घेत राहणार, असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला आहे. जरांगेंच्या सभेमध्ये अनेक वेळा त्यांनी मंत्र्यांवर टीका केली. एवढंच नाही तर, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा अनेकवेळा हल्लाबोल केला. दरम्यान, राज्य सरकारने मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्या. परंतु, मनोज जरांगे पाटील यांच्या सभा सुरु आहेत, तर जरांगेंनी बीडमध्ये बैठक घेण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र बीड येथील पोलिसांनी ही परवानगी नाकारली. दरम्यान जरांगेंसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?

आज (20 मार्च) रोजी मनोज जरांगेंची (Manoj Jarange) सभा बीड येथे आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी जरांगेंनी (Manoj Jarange Patil) बीड पोलिसांकडे परवानगी मागितली होती. यावेळी काही कारणामुळे पोलिसांनी या सभेसाठी परवानगी नाकारली. मात्र बीड जिल्हाधिकारी यांनी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अनुषंगाने काढलेल्या आदेशानुसार जातीय सभा संमेलनावर, बैठकांवर बंदी घालण्याचं सांगितलं.

त्यामुळे या आदेशानुसार पोलिसांनी परवानगी नाकारली होती. याविरोधात बैठकीच्या आयोजकांनी छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठात धाव घेत याचिका दाखल केली होती. त्यावर आज ही सुनावणी पार पडली असून, न्यायालयाने अटी शर्तींच्या अधीन राहून बैठकीला परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जरांगे यांच्यासह आयोजकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मला बदनाम करण्याचा प्रयत्न-

बीड येथे सभा स्थळी बोलत असताना जरांगे (Manoj Jarange) म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून माझ्यावर आरोप केले जात आहेत. मराठा बांधवांपासून लांब करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर, देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझे नवीन व्हिडीओ काढायला सुरुवात केली आहे. ते व्हिडीओ एडिट करुन मला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू केल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

News Title : manoj jarange gets good news

महत्त्वाच्या बातम्या-

‘माझं धार्मिक स्थळांना भेट देणं…’; सारा अली खानने नेटकऱ्यांना सुनावलं

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा देश सोडणार?; ‘या’ देशात होणार शिफ्ट?

शहांसोबतच्या भेटीबाबत बाळा नांदगावकरांनी दिली महत्त्वाची माहिती!

अमोल कोल्हेंविरोधात ‘हा’ नेता लढणार?; दिलीप वळसेंच्या बंगल्यावर खलबतं

जावेद अख्तर यांचा पहिल्या लग्नाबाबत मोठा खुलासा!