शहांसोबतच्या भेटीबाबत बाळा नांदगावकरांनी दिली महत्त्वाची माहिती!

Raj Thackeray | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीस दिल्लीमध्ये गेले. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे देखील उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) आणि अमित शहा यांच्यामध्ये चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीवर चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली. याबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली.

अमित शहा यांच्या भेटीस राज ठाकरे (Raj Thackeray) दिल्लीला गेले होते. त्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या जागांबाबत चर्चा झाली असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. दिल्लीहून राज ठाकरे अमित शहांची भेट घेऊन मुंबईला रवाना झाले. यावेळी बाळा नांदगावकरांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली.

राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीमध्ये सर्वकाही सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना दिली आहे.

काय म्हणाले बाळा नांदगावकर?

?राज ठाकरे दिल्लीला गेले होते. ही गोष्ट खरी आहे. त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे देखील होते. त्यांची आणि अमित शहा यांची भेट झाली आहे. त्यानंतर ते पुन्हा मुंबईला आले आहेत. अमित शहा आणि राज ठाकरे यांच्यामध्ये आणखी एकदा चर्चा होणार आहे”, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

किती जागा मिळणार?

“मी त्या बैठकीला नव्हतो राजसाहेब त्या बैठकीला होते. आणखी एक बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये सर्वकाही होईल. आमच्याकडे फॉर्म्युला वगैरे किती हे महिती नाही, केवळ सीट किती मिळवाव्यात याबाबत भावना आहे. राज ठाकरे यांना अमित शहा यांनी काय सांगितलं आहे याबाबत दोन दिवसांमध्ये माहिती सांगू”, असं बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.

दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळणार?

पत्रकारांनी बाळा नांदगावकर यांना एक महत्त्वाचा प्रश्न केला आहे. दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळणार का? असा प्रश्न केल्यावर बाळा नांदगावकर उत्तरले आहेत. ते म्हणाले की, “हा पक्षप्रमुख आणि पक्षाचा निर्णय आहे. कोणाचं नाव द्यायचं? कोणाचं नाव नाही द्यायचं याबाबत आमच्यामध्ये चर्चा झाली नाही”, असं बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.

News Title – Raj Thackeray Meet Amit Shah On Bal Nandgaonkar Statement

महत्त्वाच्या बातम्या

‘मला ग्रेट भेटीचा साक्षीदार होता आलं’; अमित ठाकरेंची पोस्ट चर्चेत

भाजपच्या डोक्याला ताप, ‘हा’ नेता ऐकायलाच तयार नाही, अपक्ष लढणार?

सर्वोच्च न्यायालयाचा शरद पवारांना दिलासा, चिन्हाबाबत मोठी अपडेट समोर

कडक उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून ‘असा’ करा स्वतःचा बचाव!

भाजपकडून पुण्यात आचारसंहितेचा भंग, रविंद्र धंगेकरांच्या आरोपांनी खळबळ